ज्याने बनवले अमेरिकेसाठी बॉम्बर B2 स्पिरिट विमान 'त्या' भारतीय इंजिनिअरला का टाकले तुरुंगात?

Noshir Gowadia jailed: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरु आहे. या दरम्यान भारतीय आणि अमेरिकेचे नागरिक असलेल्या इंजिनिअरला का अटक केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 24, 2025, 03:25 PM IST
ज्याने बनवले अमेरिकेसाठी बॉम्बर B2 स्पिरिट विमान 'त्या' भारतीय इंजिनिअरला का टाकले तुरुंगात?

Noshir Gowadia : अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या B2 स्पिरिट बॉम्बरचा वापर केला. या विमानाला स्टेल्थ बॉम्बर्स असेही म्हणतात. वापरण्यात आलेल्या या विमानाचा थेट भारताशी संबंध आहे. या विमानाची प्रॉपल्शन सिस्टम बनवण्यात एका भारतीय अमेरिकन नागरिकाचाही सहभाग होता, ज्याला नंतर तब्बल 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

का सुनावण्यात आली शिक्षा? 

नोशेर गोवाडिया हे व्यवसायाने अभियंता आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. चीनसोबत गोपनीय लष्करी माहिती शेअर केल्याबद्दल त्यांना 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याद्वारे चीनने त्यांच्या क्रूझ क्षेपणास्त्रांना शोधण्यास एक्झॉस्ट सिस्टम विकसित केली होती.

B2 स्पिरिट बॉम्बर

यूएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) नुसार, 81 वर्षीय गोवाडिया यांना पहिल्यांदा ऑक्टोबर 2005 मध्ये एका गुन्हेगारी तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती अशा व्यक्तीला दिल्याचा आरोप होता ज्याला त्याचा अजिबात अधिकार नव्हता. खटल्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले की, गोवाडिया यांनी 1968-1986 दरम्यान सुमारे 20 वर्षे B2 बॉम्बर्सच्या निर्मात्यासोबत काम केले. या काळात त्यांनी अद्वितीय प्रॉपल्शन सिस्टम आणि B2 च्या ऑब्जर्वेबल कॅपेबिलिटीज निर्मितीमध्ये काम केले. १९९७ पर्यंत ते अमेरिकन सरकारसोबत गुप्त बाबींवर काम करत राहिले.

तुरुंगाने शिक्षा सुनावली

चाचणीदरम्यान दाखवण्यात आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की, गोवाडिया यांनी जून २००३ ते जुलै २००५ दरम्यान ६ वेळा चीनला भेट दिली होती. या काळात, ते चीनमध्ये डिझाइन, चाचणी समर्थन, तंत्रज्ञानाचे चाचणी डेटा विश्लेषण या स्वरूपात त्यांच्या संरक्षण सेवा देऊ शकत होते. याचा उद्देश चीनला स्टील्थी नोजल विकसित करण्यास आणि क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली तयार करण्यास मदत करणे हा होता. अटकेच्या वेळी, गोवाडिया यांना चीनने किमान $११०,००० दिले होते. गोवाडिया यांना २०१० मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि २०११ मध्ये त्यांना ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.