मायानगरी मुंबईसह 'ही' शहरं नकाशावरून नाहीशी होणार? कोट्यवधी नागरिकाचं आयुष्य धोक्यात

Mumbai News : मायानगरी मुंबई... या शहराला प्रत्येकजण आपल्या परिनं नाव देतं. कोणासाठी ती अगदी स्वप्ननगरीसुद्धा असते. पण हीच मुंबई आणि देशातील काही शहरं धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सायली पाटील | Updated: Nov 12, 2025, 12:39 PM IST
मायानगरी मुंबईसह 'ही' शहरं नकाशावरून नाहीशी होणार? कोट्यवधी नागरिकाचं आयुष्य धोक्यात
Nature Sustainability Mumbai delhi kolkata in lnadslide danger latest update

Mumbai News : भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी कायमच चर्चेचा विषय ठरतात. कधी ही शहरं त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जातात, तर कधी ही शहरं देशाप्रती त्यांच्या असणाऱ्या योगदानासाठी ओळखली जातात. सध्या मात्र देशातील अशाच काही महत्त्वाच्या शहरांची नावं त्यांच्यापुढं असणाऱ्या धोक्यामुळं भुवया उंचावत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबई खचतेय... दिल्ली आणि कोलकातासुद्धा...

अमुक एका परिसरात इमारत खचली, रस्ता खचला या आणि अशा अनेक बातम्या आतापर्यंत आपण वारंवार पाहायला मिळता. बऱ्याचदा त्यासाठी खराब बांधकामं, जमिनीचा खालावलेला पोत आणि बेकायदेशीर अंतर्गत बदल अशी अनेक कारणं समोर येतात. 

आता मात्र मायानगरी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जमीन खचली जात असून, दरवर्षी काही मिलीमीटर अंतरानं भूखंड खचत असल्याचं एका अहवालात नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 'नेचर सस्टेनेबिलिटी' या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात त्याबाबतची निरीक्षणपर माहिती जारी करण्यात आली असून, त्यानुसार मुंबई, दिल्लीसह 5 शहरांतील सुमारे 878 चौरस किमी क्षेत्रफळाची जमीन सतत खचत आहे. 

जमीन खचण्याची कारणं HDR 

  • भूजलाचा अमार्यद उपसा मुख्य कारण 
  • पाणी उपशामुळे मातीत कोरडेपणा येऊन ती आकुंचन पावते
  • भूजलाची जागा माती घेतात अन् जमीन खचत राहते 
  • वाढता शहरी ताण, जलव्यवस्थापनाचा अभाव
  • वाढत्या क्रॉक्रिटीकरणामुळे पाणी मुरण्यात अडचण
  • अनियमित पावसाच्या चक्राचाही मोठा फटका 
  • 2002 ते 2023 दरम्यान भूजल साठ्यात मोठी घट 

2015 ते 2023 दरम्यान युरोपियन उपग्रह 'सेंटिनेल-1' कडून मिळालेल्या रडार आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला. सदर निरीक्षणपर अध्ययनानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नईतील अनेक भाग इतक्या वेगाने  खचत आहेत की त्यामुळे इमारती, रस्ते आणि जलवाहिन्यांनाही गंभीर धोका निर्माण होत आहे. ज्यामुळं कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य संकटात असल्याचंही म्हटलं जात आहे. भूजलाचा अतिरिक्त उपसा हे प्राथमिक स्तरावर जमीन खचण्याचं मुख्य कारण सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : विनाशाचे संकेत? पृथ्वीचं 'सुरक्षा कवच' दोन तुकड्यांमध्ये दुभंगणार; मोठा खुलासा

कुठे किती वेगाने खचतेय जमीन? 

  • दिल्ली- 51 मिलीमीटर 
  • चेन्नई- 31.7 मिलीमीटर 
  • मुंबई 26 मिलीमीटर 
  • कोलकाता- 16 मिलीमीटर 
  • बंगळुरू- 6.7 मिलीमीटर 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More