नवी दिल्ली:Aadhaar Appointment: भारतात आधार कार्ड एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी योजनांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. तसेच मुलांच्या शाळा प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड सहज करा अपडेट 
तुम्हाला आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख बदलायची असेल किंवा नवीन आधार कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी आता आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही घरी बसून अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि आधार सेवा केंद्रावरील लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्यापासून वाचू शकता. आधार अपडेटसाठी तुम्ही अपॉइंटमेंट कशी घ्यायची ते वाचा...


अपॉईंटमेंट घेऊन पुढील कामे करता येतात


- नवीन आधार नोंदणी
- नाव अपडेट
- पत्ता अपडेट
- मोबाइल नंबर अपडेट
- ईमेल आयडी अपडेट
- जन्म अपडेट तारीख
- लिंग अपडेट
- बायोमेट्रिक अपडेट


ऑनलाइन अपॉईंटमेंट निश्चित करणे
- Https://uidai.gov.in/ वर जा.
- My Aadhaar वर क्लिक करा आणि Book a appointment निवडा.
- आधार सेवा केंद्रासाठी अपॉइंटमेंट बुक करा.
- ड्रॉपडाउनमध्ये आपले शहर आणि स्थान निवडा.
- Proceed to book appointment वर क्लिक करा.
- मोबाइल नंबर प्रविष्ट करा, 'न्यू आधार' किंवा 'आधार अपडेट' टॅबवर क्लिक करा.
- Captcha प्रविष्ट करा आणि OTP टॅबवर क्लिक करा.
ओटीपी प्रविष्ट करा आणि वेरिफिकेशन लिंकवर क्लिक करा.
इतर तपशील भरा
- आपली वेळ निवडा आणि नेक्स्टवर क्लिक करा
यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक होईल.