NH 44 India Longest Highway: मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे या भारतातील सर्वात मोठ्या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हा जगातील सर्वांत लांब महामार्ग ठरणार आहे. दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणारा असा हा 1350 किमीचा मार्ग आहे. या महामर्गामुळे मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेच्या चार पट मोठा महामार्ग अस्तित्वात आहे. काश्मिर ते कन्याकुमारीला जोडणाऱ्या या महामार्गावरु प्रवास करताना संपूर्ण भारताचे दर्शन होते.
एनएच 44 हा भारतातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 3000 किलोमीटरच्या या प्रवासात नद्या, पर्वत, धबधबे आणि समुद्र असे सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. राष्ट्रीय महामार्ग- 44 काश्मीरमधील श्रीनगरपासून सुरू होतो आणि कन्याकुमारी येथे संपतो.
जवळपास 4,112 किलोमीटर लांबीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे जुने नाव NH-7 आहे. काश्मीरच्या बर्फातून वाट काढत या महामार्गाचा प्रवास सुरु होतो. बर्फाळ पर्वत, खळखणाऱ्या नद्या असा अप्रतिम नजारा पहायला मिळतो. या महामार्गाने पंजाबमध्ये प्रवेश केल्यावर हिरवीगार शेती पाहून मन प्रसन्न होते.
हरियाणा आणि दिल्ली मार्गे हा महामार्ग उत्तर प्रदेशात प्रवेश करतो. त्यानंतर राजस्थानमार्गे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून हा महामार्ग पुढे जातो. महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य या प्रवासात खास लक्षवेधी ठरते . महाराष्ट्रानंतर हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून जातो. कर्नाटकातील जंगलातून मार्ग काढत हा महामार्ग कन्याकुमारी येथे संपतो.
एनएच 44 महामार्ग एकाचवेळी बांधला गेला नाही. देशातील 7 प्रमुख महामार्ग एकमेकांना जोडून एनएच 44 महामार्ग निर्मिती करण्यात आली आहे. NH1A, NH1, NH2, NH3, NH75, NH26 आणि NH7 हे महामार्ग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. या राष्ट्रीय महामार्गांच्या विलीनीकरणामुळे देशात प्रथमच उत्तर-दक्षिण कॉरिडॉर तयार झाला आहे. NH44 हा देशातील सर्वात मोठा महामार्ग नाही तर जगातील 22 वा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग (1350 किमी) पेक्षा 4 पट मोठा आहे.