Nitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी पंतप्रधान मोदींना आपला पाठींबा जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण या सर्वांनी भाषणे केली. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार जाईल असा नारा देण्यात आला होता. भाजप स्वबळावर सत्तेत येईल असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. यात प्रमुख नावे होती ती चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा हॅलिकॉप्टर प्रवास समोर आला. यानंतर एनडीएच्या गोटात अस्वस्थता जाणवली. याच दरम्यान 'नितीश तो सबके है' असे बॅनर पाहायला मिळाले. याच काळामध्ये शरद पवार यांनी नितीश कुमारांना फोन केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले. त्यामुळे नितीश कुमार कोणाच्या बाजुने कौल देणार असा प्रश्न पडला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आपण पंतप्रधान मोदींसोबत कायम असल्याचे सांगितले. तसेच आजच्या सभेत तुफान बॅटींग केली. त्यांच्या भाषणावेळी एनडीएचे सर्व नेते पोट धरुन हसत होते. बेंच वाजवत होते. नरेंद्र मोदी यांनादेखील हसू आवरणे कठीण झाले होते.
This is unusual. Nitish Kumar trying to touch PM Modi's feet..
pic.twitter.com/MQxi4mZjRS— Mr Sinha (Modi's family) (@MrSinha_) June 7, 2024
नितीश कुमार आपल्या स्टाईलमध्ये बिहारी लहेजात भाषण करत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला.
10 वर्षांपासून हे पंतप्रधान आहेत. हे पुन्हा पंतप्रधान व्हायला चालले आहेत. यांनी देशाची सेवा केली. जे काही राहिलंय ते हे पूर्ण करतील. आम्ही त्यांच्या सोबत राहू.
Bihar CM Nitish Kumar sounds totally different. Have never seen him praising PM Modi like this even when BJP alone had majority.
It seems he's trying to give message that no more side change... Good... It will make INDI alliance sad...pic.twitter.com/YVFQGdB1DQ
— Mr Sinha (Modi's family) (@MrSinha_) June 7, 2024
आता इथे तिथे कोणीतरी जिंकले आहेत. पण पुढच्या वेळेस सर्वजण हरतील. या सर्वांनी आतापर्यंत काही काम केलं नाही. देशाची काही सेवा केली नाही. पुढे यांच्यासाठी काही संधी नसेल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश खूप पुढे जाईल. बिहारचे सर्व काम केले जाईल. जे राहिलंय ते होईल. खूप चांगले होईल. सर्वजण चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडत आहेत. देशाला तुम्ही पुढे न्याल. लवकरात लवकर शपथग्रहण होऊदे. आम्हाला वाटते आजच शपथविधी व्हावा,असेही ते म्हणाले.