Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...
ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.
Onling Shopping : मोबाईल (Mobile) युगात सध्या सर्व ऑनलाईन (Online) उपलब्ध होतं. खाण्याच्या वस्तूंपासून कपड्यांपर्यंत आणि दैनंदिन वापरातल्या वस्तूंपासून इलेक्ट्रीक सामानापर्यंत अगदी घरबसल्या एका क्लिकवर सर्व उपलब्ध होतं. वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होत असल्याने अनेकांचा कल ऑनलाईन शॉपिंगवर (Online Shopping) असतो. ग्राहकांची ही पसंत लक्षात घेता अनेक ऑनलाईन अॅप (Online App) सुरु करण्यात आले आहेत. पण काही वेळा ऑनलाईन मागवलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू ग्राहकाच्या हातात पडते, आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो. पण ऑनलाईन शॉपिंगच्या एका घटनेची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुलीने ऑनलाईन मागवलं सॅनिटरी नॅपकिन
ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी स्विगीने (Swiggy) दैनंदिन वस्तू पुरवण्याची सेवाही सुरु केली आहे. एका मुलीने स्विगी इंस्टामार्टवरुन (Swiggy Instamart) ऑनलाईन सॅनिटरी नॅपकिन (Sanitary Napkins) मागवलं. मुलीने मागवलेलं सामान वेळेत तिच्यापर्यंत पोहोचलंदेखील. पण जेव्हा या मुलीने ते पाकिट उघडलं तेव्हा तिला धक्काच बसला. ही संपूर्ण घटना समीरा नावाच्या मुलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. समीराने एक पोस्ट लिहिली असून त्यात तीने म्हटलंय, मी स्विगी इन्स्टमार्टवरुन सॅनेटरी नॅपकिन ऑर्डर केलं होतं.
पाकिट उघडताच बसला धक्का
समीराने पाकिट उघडताच त्यातली वस्तू बघताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्या पाकिटात सॅनिटरी पॅडबरोबर कंपनीने काही चॉकलेट्स आणि कुकीज तिच्यासाठी पाठवली होते. अनपेक्षितरित्या मिळालेल्या या सरप्राईजने समीराला आनंद झाला. तीने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान चॉकलेट्स (Chocolate) आणि कूकीज (Cookies) स्विगीन पाठवले होते, की दुकानदाराने गहे स्पष्ट होऊ शकलं नाही. पण समीराच्या पोस्टवर अनेकांना प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
युजर्सकडून घटनेचं कौतुक
काहीवेळा ऑनलाईन शॉपिंगचा ग्राहकांना वाईट अनुभव येतो. पण समीराला आलेल्या चांगल्या अनुभवावर अनेक युजर्सने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. युजर्सने कंपनीच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. चॉकटेल आणि कूकीजबरोबर कंपनीने आपला दिवस चांगला जावो अशी एका वाक्याची नोटही पाठवली होती.