Optical Illusion : तुम्ही हुशार असाल, तर सांगा 'या' फोटोमध्ये नक्की लपलंय काय?

सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना चक्रावून सोडत आहे. 

Updated: May 13, 2022, 06:32 PM IST
Optical Illusion : तुम्ही हुशार असाल, तर सांगा 'या' फोटोमध्ये नक्की लपलंय काय? title=

मुंबई : सध्या इंटरनेटवर फसवे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. खरंतर यांना ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणतात. जे पहिल्यांदा पाहाता आपल्याला त्यामध्ये काही वेगळं दिसतं, तर पुन्हा जेव्हा आपण त्याकडे नीट पाहातो, तेव्हा आपल्याला तो फोटो काही वेगळंच दिसतं, हे फोटो लोकांना आपलं डोकं खाजवायला लावतात. परंतु कितीही विचार केला, तरी बऱ्याच लोकांना यामागील उत्तर सापडंत नाही. हे फोटो आपल्या मेंदूला चालना देखील देतात.

सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना चक्रावून सोडत आहे. या फोटोमध्ये काळ्या पांढऱ्या रेषा आहेत, ज्या आपल्या डोळ्यांना भ्रम तयार करत आहेत. जे आपल्या मेंदूची आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेत आहे.

या फोटोला पाहिल्यावर अनेकांना यामध्ये मांजर किंवा उंदीर दिसत आहे. तुम्ही एकदा नीट फोटो पाहा आणि तुम्हाला यामध्ये नक्की काय दिसतंय, ते पाहा.

खरंतर या फोटोमध्ये ना मांजर लपलीय, ना उंदीर हा फक्त एक भ्रम तयार होत आहे.

@PamelaApostolo1 ने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तुमचा मेंदू कसा काम करतो यावर तुम्हाला काय दिसतं हे अवलंबून आहे.