चित्रातील असंख्य कोळंबींमध्ये लपलेय चार खेकडे; हुशार असाल तर 10 सेकंदात शोधा
ऑप्टीकल इल्युजनचे अनेक फोटो आपल्याला संभ्रमीत करतात. त्यात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधताना आपण हैराण होतो. परंतू या प्रश्नांची उत्तरं वाटतात तितकी सोपी नसतात. त्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो. बारकाईने संबधीत फोटोंकडे लक्ष दिल्यास विचारलेल्या प्रश्नांची सहज उत्तरे देता येतात.
मुंबई : ऑप्टीकल इल्युजनचे अनेक फोटो आपल्याला संभ्रमीत करतात. त्यात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधताना आपण हैराण होतो. परंतू या प्रश्नांची उत्तरं वाटतात तितकी सोपी नसतात. त्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो. बारकाईने संबधीत फोटोंकडे लक्ष दिल्यास विचारलेल्या प्रश्नांची सहज उत्तरे देता येतात.
ऑप्टीकल इल्युजन प्रकारातील हे चित्र हंगेरीचे चित्रकार गेर्जली डुडास यांनी बनावले आहे. तुम्ही हे चित्र पाहताच चक्राऊन जाल. या चित्रामध्ये कोळंबी माशांमध्ये चार खेकडे लपले आहेत. ते तुम्हाला शोधायचे आहेत. या चित्रांमधील खेकडे शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी तुमची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी तल्लख असावी. चला तर तुमचं चॅलेंज सुरू होतंय आता...
कोळंबीमध्ये तुम्हाला ते 4 खेकडे दिसले का?
चित्रात तुम्ही पाहू शकता की अनेक कोळंबी समुद्राच्या खोलवर इकडे तिकडे फिरत आहेत. कोळंबी, स्टार फिश आणि गोगलगाय देखील या चित्रात दिसतात. कोळंबींमध्ये चार खेकडे देखील आहेत. तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर, तर या चित्रातील खेकडे शोधून दाखवा.
चला तर आम्हीच तुम्हाला सांगतो की चित्रात खेकडे कुठे आहेत?