Optical Illusion : दोन्ही फोटोंमध्ये आहेत 3 बदल, हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात शोधा

Puzzle : दोन्ही चित्रांमध्ये 3 चूका दडल्या आहेत. अवघ्या 10 सेकंदात या शोधायच्या आहेत. पण 99% लोक यामध्ये अपयशी होतात.. पाहा तुम्हाला दिसतात का? 

| Updated: Oct 16, 2023, 05:06 PM IST
Optical Illusion : दोन्ही फोटोंमध्ये आहेत 3 बदल, हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात शोधा  title=

Optical Illusion : मेंदूला चालना मिळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी Optical Illusion किंवा Puzzel सारख्या गोष्टी मदत करतात. कारण रोजच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला काही सेकंद थोडा विचार करायला लावणारे हे पझल असतात. 

येथे तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत जे जवळपास सारखीच दिसतात. पण यामध्ये 3 चुका दडल्या आहेत. जवळपास 99 टक्के लोकांना हे सहज डोळ्यांनी दिसत नाही. पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात या चुका ओळखतात. 

या दोन्ही चित्रामध्ये एक तरुणी गोल्फ खेळताना दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाण ही दोन्ही चित्रे एकसारखी दिसतात. पण या चित्रांमध्ये ३ फरक आहेत. जर तुमची नजर तिक्ष्ण असेल तर त्या ३ चूका शोधून दाखवा. या चूका शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंद मिळतील. (Source: YouTube)

चित्रांमध्ये फरक ओळखा 

या 3 चूका शोधण्यासाठी तुम्हाला चित्राचं नीट बारकाईनं निरिक्षण करावं लागेल. गोल्फ खेळणाऱ्या दोन्ही तरुणींमध्ये काय फरक आहे हे शोधा. चित्राचा प्रत्येक कोपरा नीट तपासून पाहावा लागेल. चला तर मग कोडं सोडवायला सुरूवात करायची का? कारण तुमच्याकडे आहेत 10 सेकंद

10...  

9... 

8....

7...

6....

5...

4....

3....

2...

1....

बराच वेळ विचार केल्यानंतरही तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. कारण अनेकदा आपल्या नजरेसमोर असूनही दुर्लक्ष करतो. त्यामुळे वाईट वाटण्याचं कारण नाही.. तुम्ही खालील चित्र नीट पाहा. फरक अगदी सहज कळेल. 

3 फरक कोणते?

फरक नंबर 1 - गोल्फ बॉल पाहा, दोन्ही चित्रांमध्ये बॉल वेगवेगळ्या जागी दिसतोय. तुम्हाला यासाठी अतिशय करडी नजर लागेल. 

फरक नंबर 2 - पाठीमागे रस्ता पाहा, दोन्ही रस्त्यांच्या आकारात फरक दिसतोय. तसेच मुलीच्या पायापासून रस्ता किंचित फरकाने बदलला आहे.

फरक नंबर 3 - तरुणीची टोपी पाहा, दुसऱ्या चित्रात टोपी थोडीशी मोठी दिसतेय. हा फरक किंचितसा आहे पण महत्त्वाचा आहे. 

तुम्हाला हे ऑप्टिकल इल्युजन सोडवून मजा आली असेल तर तुमच्या मित्र-परिवाराला नक्की पाठवा. थोडा विचार करायला लावणारे हे Optical Illusion आहे. यात शंका नाही ( फोटो सौजन्य: YouTube)