नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, कठोर लष्करी कारवाईनंतरही जम्मू काश्मीरमधील परिस्थीती सुधारताना दिसत नाही.  सरकारला ३० आणि ३१ डिसंबरच्या रात्री याचा पुन्हा एकदा अनुभव आला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात ५ जवान ठार तर, ३ जखमी झाले. आमचे जवान आणि पोलीस रोज ठार होत आहेत. सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? असा सवालही चिदंबरम यांनी विचारला आहे.


चिदंबरम यांनी पुढे म्हटले आहे की, गुजरात निवडणुकीपूर्वी सरकारने दिनेश्वर शर्मा यांना जम्मू-काश्मीरचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले खरे. पण, सरकारने हे कधीच स्पष्ट केले नाही की, त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नेमकी कोणतीह जबाबदारी दिली आहे. सरकारने सांगितले की, शर्मा विशेष प्रतिनिधी म्हणून जम्मू काश्मीरमधील विशेष प्रतिनिधी म्हणून त्या लोकांशी काम करतील, जे त्यांच्याशी बोलू इच्छितात. या संवादामुळे काश्मीरमदील दगडफेक आणि दहशतवादी कारवाया थांबतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात खरेच असे झाले का? असा सवालही चिदंबरम यांनी विचारला आहे.