Patanjali Ayurved: स्वामी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली, पतंजली आयुर्वेदने भारताच्या आरोग्य आणि स्वावलंबन क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. पतंजलीचे उद्दिष्ट फक्त व्यवसाय करण्यापुरते मर्यादित नाही. भारतीयांनानिरोगी जीवन जगण्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरित करणे हा देखील यामागचा उद्देश आहे.
पतंजली योग, आयुर्वेद, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून ते भारताच्या प्राचीन परंपरांना वर्तमान काळाशी जोडत आहेत. एक नवीन भारत विकसित करत आहेत. बाबा रामदेव यांच्या दूरदृष्टीमुळेच पतंजली आयुर्वेद पुढे जात आहे. बाबा रामदेव यांचे दृष्टिकोन भारताला निरोगी आणि स्वावलंबी बनवण्यात विविध मार्गाने मदत करत आहे.
देशातील प्रसिद्ध योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. पतंजली नैसर्गिक उपचारांचा आणि चांगल्या आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देत आहे. लोकांनी निरोगी जीवनशैलीचे पालन करावे, जेणेकरून लोक अॅलोपॅथिक औषधांवर कमी अवलंबून राहतील आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील असे पतंजलीचे उद्दिष्ट आहे. ही विचारसरणी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' योजनेशी देखील जोडलेली आहे.
हरियाणातील एका छोट्या गावातून जागतिक आयकॉन असा बाबा रामदेव यांचा जीवप्रवास खूपच प्रेरणादायी आहे. बाबा रामदेव यांची कहाणी आपल्याला जीवनाचे खूप महत्त्वाचे धडे शिकवते. कितीही अडचणी आल्या, त्यावर मात करण्याची त्यांची जिद्द, त्यांच्या तत्त्वांचे पालन आणि लोकांशी थेट त्यांच्या हृदयातून जोडण्याची त्याची शक्ती, ही त्यांची ओळख आहे.
योग आणि आयुर्वेद सर्वांना उपलब्ध करून देणे हे देखील उद्दीष्ट आहे. बाबा रामदेव यांनी योग इतका सोपा केला आहे की आता कोणीही वय किंवा ठिकाण काहीही असो, ते समजून घेऊ शकतो आणि करू शकतो. बाबा रामदेव यांच्या मोठ्या योग शिबिरांमुळे आणि टीव्ही कार्यक्रमांमुळे, योग प्रत्येक घरात पोहोचला आहे. हेच कारण आहे की आता योग हा अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बाबा रामदेव योग शिकवण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी जगभर प्रवास करतात. अशाप्रकारे, ते भारताचे प्राचीन ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतात आणि योगापासून कोणते फायदे मिळू शकतात हे सांगतात.
बाबा रामदेव दररोज थेट योगाभ्यास करतात. योग आणि आयुर्वेदाद्वारे लठ्ठपणा, रक्तदाब, साखर, थायरॉईड आणि हृदय यासारख्या प्रमुख आजारांवर कसा उपचार करता येवू शकते हे लोकांना योग विद्येद्वारे लोकांना पटवून देतात. स्वामी रामदेव यांचे स्वप्न आहे की भारत आरोग्य क्षेत्रात मजबूत व्हावा आणि इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहू नये. त्यांचे विचार योग आणि आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय परंपरांवर आधारित आहेत. लोक निरोगी राहावेत आणि देश स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे स्वप्न केवळ लोकांचे आरोग्य सुधारणे हे नाही तर अशी मानसिकता निर्माण करणे आहे. जिथे लोक देशाचे आरोग्य आणि स्वतःचे उत्पन्न या दोन्हींना महत्त्व देतील.