EMI हून 10 पट लहान रकमेची SIP काढा, होम लोन होईल पूर्णपणे Free; समजून घ्या सगळा हिशोब!

Home loan and SIP: तुम्हीदेखील बँकेतून कर्ज घेतलेत पण तुम्ही घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त व्याज तुमच्याकडून घेतलं जातंय. तर ही बातमी वाचाच! 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2025, 07:02 PM IST
EMI हून 10 पट लहान रकमेची SIP काढा, होम लोन होईल पूर्णपणे Free; समजून घ्या सगळा हिशोब!
personal finance how to recover home loan interest through mutual fund sip

Home Loan and SIP: तुम्ही कधी तुमचं कर्ज किती बाकी राहिलंय आणि किती वेळापर्यंत हफ्ते भरावे लागतील याचा हिशोब केला आहे का? जर तुम्ही कर्जाचा हिशोब केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही 10टक्के कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या 20 टक्के जास्त तुम्ही बँकाना देत आहात. पण म्युच्युअल फंड एसआयपीच्या मदतीने तुम्ही कर्जाचे व्याज रिकव्हर करू शकता. कसं ते जाणून  घेऊयात. 

कोणतेही लोन घ्यायचं असल्यास बँकेला तुम्हाला व्याज द्यावेच लागते. व्याज किती द्यावे लागेल हे तुम्हाला लोनचा प्रकार आणि बँकेवर अवलंबून असते. तुमचे लोन किती वर्षांसाठी आहे त्यावरही अवलंबून असते. जसं की, होम लोन, कार लोन किंवा शैक्षणिक लोन हे 20-25 वर्षांसाठी असेल तर त्यावर व्याजदेखील तितकेच लागते. कर्ज म्हणून घेतलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम बँकेला द्यावी लागते. याचा हिशोब तुम्ही EMI तपासून पाहू शकता. 

तुम्ही गुगलवर EMI Calculator सर्च करुन कोणत्याही बँकेचा कॅलक्युलेटर वापरु शकता. EMI Calculator मध्ये तुम्हाला लोन अमाउंट, इंटरेस्ट रेट आणि कर्जाची वर्षे याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर तुमचा EMI आणि त्यावरील व्याज याचा संपूर्ण हिशोब मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही 7.5 टक्के इंटरेस्ट रेटवर 40 लाखाचे होम लोन घेतले आहे. त्यासाठी तुम्ही 25 वर्षांचा कालावधी घेतला आहे. अशावेळी तुमचा महिन्याचा EMI 29,500 बसेल. या पद्धतीने 25 वर्षांत तुम्ही 88 लाख रुपये तुम्ही बँकेला परत देणार आहेत. म्हणजेच 40 लाखाच्या कर्जासाठी 48 लाख रुपये तुम्ही व्याज म्हणून बँकाला देणार आहात. ही रक्कम तुम्ही SIP च्या मदतीने रिकव्हर करु शकता. 

म्युच्युअल फंडसाठी तुमचं टार्गेट आधीच सेट असेल. जितकी रक्कम तुम्ही व्याज म्हणून बँकेला दिली आहे ती परत मिळवणे हे तुमचं लक्ष्य आहे. आता तुम्ही  SIP Target Calculator गुगलवर सर्च करायचे आहे. यामध्ये, तुम्हाला तुमचे लक्ष्य जोडावे लागेल, तुम्हाला ते लक्ष्य किती वर्षांत साध्य करायचे आहे आणि एका वर्षात तुम्हाला किती परतावा अपेक्षित आहे. जर तुम्ही कमी जोखमीचा एसआयपी निवडला, तर 12 टक्के परतावा देणारी 3,500 रुपयांची एसआयपी सुरू करून, तुम्ही 25 वर्षांत 59 लाख रुपयांचा निधी उभारू शकाल. या 59 लाखांपैकी 49 लाख रुपये फक्त म्युच्युअल फंड परतावा असतील. जर तुम्ही उच्च जोखीम-उच्च परतावा देणारी एसआयपी निवडली, तर तुम्ही 2200 ते 2500 रुपयांच्या एसआयपीनेही तुमचे लक्ष्य साध्य करू शकता.

तुम्ही जे EMI भरणार आहेत, जसं की तुमचा हफ्ता 29,500 रुपये आहे. त्याच्या 10 टक्कांपर्यंतच्या कमी SIPवर तुम्ही कर्जाचे व्याज रिकव्हर करु शकता. त्यामुळं तुमच्या आर्थिक गोष्टींवर अधिक ताण पडणार नाही आणि तुम्ही व्याज म्हणून जाणाऱ्या रकमेचे नुकसानही भरून निघणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)