Petrol Price Today: कच्च्या तेलात उसळी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? झटपट चेक करा आजचे दर
Petrol Diesel Price : गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. 2010 मध्ये पेट्रोलचे दर आणि 2014 मध्ये डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर किरकोळ तेलाच्या किंमती निश्चित करणे पूर्णपणे तेल कंपन्यांवर अवलंबून आहे.
Petrol Diesel Price on 26 May 2023 : देशात दररोज पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जारी केले जातात. शुक्रवारी म्हणजेच 26 मे ला पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. मात्र, देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.तर महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी 107.02 रुपये दराने खरेदी-विक्री होत आहे. काल, 25 मे 2023 पासून महाराष्ट्रात किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 107.02 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची सरासरी 93.65 रुपये दराने विक्री होत आहे.
आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
शहर | पेट्रोल (रु.) | डिझेल (रु.) |
अहमदनगर | 106.46 | 92.97 |
अकोला | 106.73 | 92.26 |
अमरावती | 106.91 | 93.43 |
औरंगाबाद | 108.00 | 95.96 |
भंडारा | 107.11 | 93.62 |
बीड | 107.28 | 94.76 |
बुलढाणा | 107.05 | 93.56 |
चंद्रपूर | 107.05 | 93.48 |
धुळे | 106.60 | 93.11 |
गडचिरोली | 107.52 | 94.01 |
गोंदिया | 107.64 | 94.13 |
बृहन्मुंबई | 106.31 | 94.27 |
हिंगोली | 107.43 | 93.93 |
जळगाव | 107.50 | 94.99 |
जालना | 107.84 | 94.30 |
कोल्हापूर | 106.58 | 93.11 |
लातूर | 107.27 | 93.76 |
मुंबई शहर | 106.31 | 94.27 |
नागपूर | 106.61 | 93.14 |
नांदेड | 108.64 | 95.08 |
नंदुरबार | 107.51 | 93.99 |
नाशिक | 106.25 | 92.76 |
उस्मानाबाद | 106.94 | 93.45 |
पालघर | 106.06 | 93.55 |
परभणी | 108.76 | 95.20 |
पुणे | 105.91 | 92.43 |
रायगड | 106.14 | 92.39 |
रत्नागिरी | 108.01 | 94.49 |
सांगली | 106.49 | 93.02 |
सातारा | 106.74 | 93.23 |
सिंधुदुर्ग | 107.83 | 94.31 |
सोलापूर | 106.64 | 92.16 |
ठाणे | 105.74 | 92.24 |
वर्धा | 106.91 | 93.42 |
वाशिम | 106.91 | 93.43 |
यवतमाळ | 107.29 | 94.80 |
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या
तुमच्या मोबाईलवर IndianOil चे IndianOil ONE Mobile App डाउनलोड करून, तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलची किंमत सहज पाहता येईल.
पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आरएसपी आणि स्पेस दिल्यानंतर तुम्हाला 9224999249 किंवा तुमचा शहर कोड या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. हा कोड इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.