PM Kisan Alert | ई-केवायसी नसेल तर योजनेचा लाभ बंद; या पद्धतीने करा चेक
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सुरु केली आहे.
मुंबई : पंतप्रधान किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा 10वा हप्ता (PM Kisan 10th Installment) लवकरच जारी होणार आहे.
योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या संदेशात असे म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील'. त्याचवेळी पीएम मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
ई-केवायसी अनिवार्य
दरम्यान, पीएम किसानबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, त्यांना 1 जानेवारीला 2000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही.
योजनेअंतर्गत येणाऱ्या 10 व्या हफ्ताच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
1. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in.
2. येथे तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
4. नंतर ड्रॉप-डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
5. त्यानंतर 'Get Report' वर क्लिक करा.
6. लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
-