पंतप्रधान मोदींचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे संकेत

कोरोना महासंकटाच्या काळातही आपल्या निवडणूक प्रक्रीयेची मजबूती जगाने पाहील्याचे पंतप्रधान म्हणाले.

Updated: Nov 26, 2020, 04:05 PM IST
पंतप्रधान मोदींचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे संकेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) संविधान दिनानिमित्त जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई हल्ल्यातील (Mumbai Attack) शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. यातून कोणीही सुटणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. आपलं संविधान २१ शतकातील प्रत्येक आव्हानाशी लढण्यास मार्गदर्शन करतं. संविधान ७५ वर्षांकडे वेगाने चाललंय. स्वतंत्र भारत पंचाहत्तरीच्या दिशेने चाललाय. राष्ट्राला दिलेल्या संकल्पात पूर्ण ताळमेळ साधावा लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानांनी देशातील जनतेशी संवाद साधला.

कोरोना महासंकटाच्या काळातही आपल्या निवडणूक प्रक्रीयेची मजबूती जगाने पाहीली. इतक्या मोठ्या स्तरावर निवडणूक होणे, वेळेवर निकाल लागणे, सरकार बनणं हे इतकं सोप्प नाहीयं. आम्हाला आमच्या संविधानाने ही ताकद दिलीय ज्यामुळे कठीण सोपं होतं.

संविधानाच्या रक्षणात न्यायपालिकेचा मोठा हात असतो. ७० ची दशकात याचा भंग करण्याचा प्रयत्न झाला. पण संविधानानेच याचे उत्तर दिले. आणिबाणीच्या काळातही सिस्टिम मजबूत राहीली. यातही आम्हाल खूप काही शिकायला मिळालं.