नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. तर संपूर्ण जगात विविध लसींवर संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोना लशीला हिरवा कंदिल देखील दाखवण्यात आला आहे. आता लवकरच भारतात देखील कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे पार पडलेल्या बैठकीत ते म्हणाले की, 'वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतात देखील लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. कोरोना लसीची किंमत किती असेल. तिचे वितरण कशाप्रकारे होईल. इत्यादी विषयांवरून सध्या इतर राज्यांशी चर्चा सुरू असल्याचं मोदी म्हणाले. 


महत्त्वाचं म्हणजे कोरोना लस प्राधान्याने दिली जाणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वृद्ध नागरिकांना कोरोना दिली जाणार आहे. शिवाय स्वस्त दरात कोरोना लस उपलब्ध करून देण्याकडे मोदींचा मानस आहे. एकूण ८ कोरोना लसींच्या चाचण्या भारतात सुरू असून त्यांचे उत्पादन देखील भारतात होणार आहे. 


याशिवाय मोदी म्हणाले, देशात कोरोना लस बाजारात आल्यानंतर बनावट लसींचे देखील उत्पादन होवू शकतं, अनेक अफवा देखील पसरू शकतात त्यामुळे जनतेने सर्व गोष्टींना बळी पडू नये असं देखील मोदी म्हणाले.