नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्राझील यात्रेदरम्यान देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सकाळी ट्विट करत, त्यांना श्रद्धांजली दिली. पंडित नेहरु यांची आज १३०वी जयंती आहे. नरेंद्र मोदी ११व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्रासीलिया येथे दाखल झाले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींशिवाय क्राँग्रेस पक्षाकडूनही जवाहरलाल नेहरुंना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवरुन जवाहरलाल नेहरुंचे विचार ट्विट केले आहेत.



आज १४ नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. पंडित नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये उत्तर प्रदेशमधील अलाहबाद येथे झाला होता.


जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांप्रति अतिशय प्रेम होतं. लहान मुलांमध्ये ते 'चाचा नेहरु' म्हणून प्रसिद्ध होते. भारतात १९६४ च्या आधी बाल दिवस २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. परंतु १९६४ मध्ये पंडित नेहरुंच्या निधनानंतर त्यांचा जन्मदिवस, बालदिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. 


 


जवाहरलाल नेहरु १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.