देशातील सर्वात ताकदवर इंजीनला पंतप्रधान मोदी देणार हिंरवा झेंडा
देशाच्या सेवेत य़ेणार नवीन इंजीन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी मधेपुरामध्ये नवीन इंजीन कारखान्याचं उद्घाटन करणार आहे. फॅक्ट्रीमध्ये निर्मित पहिलं विद्युत इंजीन राष्ट्राला समर्पित केलं जाणार आहे. लवकरच देशात मधेपुरा रेल्वे कारखान्यातील पहिलं इंजीन धावणार आहे. भारत रूस, चीन, जर्मनी, स्वीडन या देशांसह भारत देखील त्या देशांच्या यादीत सहभागी होईल ज्य़ांच्याकडे 12,000 एचपी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचं इंजीन आहे. सध्या भारतीय रेल्वेकडे 6,000 एचपी क्षमता असलेलं इंजीन आहे.
12 हजार हॉर्स पॉवरचं इंजीन देशातलं सर्वात शक्तिशाली इंजीन आहे. हे इंजिन मालगाडीचा वेग दुप्पटीने वाढवणार आहे. हे इंजीन 9000 टनपर्यंतचा माल खेचण्याची क्षमता ठेवतो. देशातील पहिलं 12,000 हार्स पॉवर क्षमतेचं विद्युत इंजीनला रिमोट कंट्रोलने रवाना केलं जाईल.
रेल्वे आणि फ्रांसची कंपनी एल्सताम यांच्यात करार झाल्यानंतर हे पहिलं इंजीन देशाच्या सेवेत येणार आहे. 2015 मध्ये हा करार झाला होता. रेल्वे क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होती.