नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, कुशीनगर आणि उत्तराखंडमध्ये एकूण 79 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. जवळच्या रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू आहेत. हरिद्वारमध्ये बनलेल्या दारूमध्ये नशा वाढवण्यासाठी उंदीर मारण्याचे औषध टाकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. विषारी दारूमध्ये सहारनपूर येथेच 35 जणांचे मृत्यू झाले तर 11 जणांनी मेरठमध्ये उपचार घेतानाच शेवटचा श्वास घेतला. हरिद्वारमध्ये 24 आणि कुशीनगरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. हरिद्वारच्या बालूपुर गावातील एका तेरावीच्या कार्यक्रमासाठी आलेल्यांचे मरणाऱ्यांमध्ये प्रमाण जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


175 अटक 


सहारनपूर आणि कुशीनगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने अनेकांचे मृत्यू झाल्यानंतर कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने याविरोधात अभियान सुरू केले आहे. चोवीस तास सुरू असणाऱ्या या अभियानात अवैध दारु बनवणाऱ्या आणि विकणा प्रकरणी एकूण 297 केस दाखल करण्यात आले आहेत. तसेच 175 लोकांना अटक करण्यात आली आहेत. पोलीस आणि आबकारी विभागाने चालवलेल्या या अभियानात 9269.7 लीटर अवैध दारू आणि 47700 किलोग्रॅम कच्ची दारू जप्त करण्यात आली आहे. 



या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नागल ठाणे प्रभारी सहित दहा पोलीसकर्म, उत्पादन विभागचे तीन निरीक्षक आणि दोन कॉंस्टेबल्सना निलंबित करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने ही कडक कारवाई केली. तर उत्तराखंड सरकारने उत्पादन विभागाच्या 13 कर्मचारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. एक व्यक्ती साधारण 30 पाऊच दारू सहारनपूरला घेऊन आला होता असे उत्तर प्रदेशच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. यामध्ये मृत्यूचे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे.


रात्री उशीरापर्यंत कारवाई 


उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि डीडीपीने रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स करुन सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना अवैध दारु विरोधात मोहिम चालवण्याचे निर्देश दिले. यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये अवैध दारू दुकानांवर छापेमारी करण्यात आली. 


उत्तराखंड सरकारने मृत व्यक्तीच्या नातेवाईांना दोन-दोन लाख रुपये आणि रुग्णालयात भरती असणाऱ्यांना 50-50 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने आधीच मदतीची घोषणा केली आहे.