सामान्यांचा पुन्हा फायदा; GST कपातीमागोमाग आता Home Loan... कर्जाचा हफ्ता घटणार?

Home Loan News : घरासाठी कर्ज घेतलंय? पगारातील एक मोठी रक्कम हफ्ता म्हणून कापली जाते आणि हाती तुटपूंजी रक्कम राहते? RBI कडून दिलासा देणारे संकेत!    

सायली पाटील | Updated: Oct 7, 2025, 03:19 PM IST
सामान्यांचा पुन्हा फायदा; GST कपातीमागोमाग आता Home Loan... कर्जाचा हफ्ता घटणार?
post GST Cut there might be good news releif for Home loan buyers RBI may cut Interest rate latest update

Home Loan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा या पदाची सूत्र सांभाळल्यानंतर देशाला आणि देशातील जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मोदी सरकारनं निर्णयांची जणू रिघच लावली. अशा या निर्णयांमध्ये आता आणखी एका नव्या धोरणात्मक निर्णयाचा समावेश होणार असून, त्याचा फायदा सामान्यांना मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

Add Zee News as a Preferred Source

मोदी सरकार घेणार सामान्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय? 

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या शिफारसीनंतर केंद्राच्या जीएसटी परिषदेकडून GST करांसंदर्भातील दरांमध्ये बदल केले जाणार असून, यामुळं सामान्यांना दिलासा मिळाला. ज्यामागोमाग आता देशातील सर्वोच्च बँक कार्यकारिणी असणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनही असाच एक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयाचा थेट फायदा देशातील गृहकर्जधारकाना (Home Loan) मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Air India चा मोठा विमान अपघात टळला; पक्षी फ्लाईटला आदळताच 158 प्रवाशांचा जीव कंठाशी...

आरबीआय येत्या काळात रेपो रेटमध्ये मोठे बदल करणार असून, पुन्हा एकदा या दरांमध्ये कपात अपेक्षित आहे. ज्यामुळं बँकांकडून कर्ज घेणं स्वस्त होणार असून, घरच नव्हे तर वाहन कर्जसुद्धा स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. कर्ज स्वस्त झाल्यास कर्जाचा हफ्तासुद्धा कमी होणार असून, खातेधारकांच्या अर्थात सामान्यांच्या हाती आणखी पैसे राहणार असं हे गणित दृष्टीक्षेपात आहे. 

आरबीआय खरंच घेणार इतका मोठा निर्णय? 

महागाई दर सध्या नीच्चांकी आकड्यावर असल्या कारणानं येत्या महिन्यांमध्ये आणखी एकदा व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालात यासंदर्भातील माहिती समोर आली, जिथं बँक ऑफ बडोदाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार जीएसटी दरांमध्ये कपात आणि चालू तिमाहीमध्ये सणासुदीच्या दिवसांदरम्यान सामान्यांकडून केला जाणारा खर्च पाहता भारताच्या आर्थिक विकासामध्ये यामुळं आणखी भर पडू शकते. ज्यामुळं आरबीआयकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. तेव्हा आता पूर्वानुमानानुसार खरंच आरबीआय कर्जधारकांना हा दिलासा देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More