)
Premanand Maharaj News: अध्यात्मिक गुरू (Spiritual Guru) आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणाऱ्या (Premanand Maharaj Video) प्रेमानंद महाराज यांचे अनेक व्हिडीओ बऱ्याचदा अनेकांच्याच सोशल मीडिया फीडमध्ये दिसतात. मात्र याच प्रेमानंद महाराज यांच्या आरोग्यासंदर्भातील काहीशी चिंता वाढवणारे व्हिडीओ मागील काही दिवसांपासून समोर आल्या होत्या. ज्यामुळं अनेक अनुयायांच्या चिंतेतही भर पडली. सध्याच्या घडीला प्रेमानंद महाराज यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा आहेत का? याबाबतच खुद्द त्यांनीच माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे.
वृंदावन (Vrindavan) येथील संत, अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज याच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागलेली असतानाच आता एक सकारात्मक वृत्त समोर आलं आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्यांनीच आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. जिथं ते आता प्रकृतीत काही सुधारणा असून हातही व्यवस्थित काम करत आहेत, डोळे उघडता येत आहेत असं म्हटलं.
सूत्रांच्या महितीनुसार प्रेमानंद महाराज यांच्यावर केली कुंज आश्रम इथं उपचार सुरू असून, दैनंदिनपणे त्यांच्यावर डायलिसिस सुरू आहे. त्यांच्या संपूर्ण शरीराला सध्या सूज असून, हातांवरही पट्ट्या बांधण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
जागतिक स्तरावर लोकप्रियतेच्या प्रवाहात आलेले प्रेमानंद महाराज बऱ्याच वर्षांपासून किडनी विकारानं त्रस्त आहेत. त्यांच्यावर दैनंदिन स्वरुपात डायलिसिस उपचार पद्धती सुरू असून मागील काही दिवसांत मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. पहाटेच्या वेळी होणारी प्रभातफेरीसुद्धा त्यांनी स्थगित केली असून, सध्या आश्रमाबाहेर येणंही त्यांना शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.
आश्रमाकडून यापूर्वीच त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती जारी करत पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर, भक्तांनाही दर्शनासाठी पदयात्रा मार्गावनर प्रतीक्षा न करण्याचं आवाहन आश्रमाकडून करण्यात आलं आहे.
प्रेमानंद महाराज के भक्तों के लिये आवश्यक सूचना :
केली कुंज आश्रम में ही हैं संत प्रेमानंद महाराज, एकांतिक वार्ता और एकांतिक दर्शन पूर्व की भांति होते रहेंगे!
सुबह 4 बजे की पदयात्रा अगली सूचना तक स्थगित!#PremanandMaharaj pic.twitter.com/aheq0jGbJQ
— Vishal JyotiDev Agarwal (@JyotiDevSpeaks) October 7, 2025
दरम्यान सुधारणेच्या या व्हिडीओआधी प्रेमानंद महाराज यांचा एक अतिशय चिंतातूर करणारा व्हिडीओ समोर आला होता. जिथं त्यांच्या शरीराला प्रचंड सूज आल्याचं पाहायला मिळालं. सुज आल्यानं चेहरा लालसर पडून निस्तेज झाला असून, डोळेसुद्धा पाणावल्याचं या व्हिडीओमधघ्ये दिसून आलं. तर, कपाळी टिळा नाही, थरथरता आवाज आणि अशा स्थितीतही किर्तन करणारे प्रेमानंद महाराज पाहून त्यांच्या तब्येतीबाबत अनेकांनीच काळजी करणारे प्रश्न उपस्थित केले होते.
प्रेमानंद महाराज यांची सध्याची प्रकृती कशी आहे?
प्रेमानंद महाराज यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु किडनी विकारामुळे दैनंदिन डायलिसिस सुरू आहे. त्यांच्या शरीरात सूज आहे आणि दोन्ही हातांवर पट्ट्या बांधलेल्या आहेत.
प्रेमानंद महाराज यांच्यावर कोणते उपचार सुरू आहेत?
त्यांच्यावर वृंदावनातील केली कुंज आश्रमात डायलिसिस उपचार सुरू आहेत. किडनी विकारामुळे ही प्रक्रिया दैनंदिनपणे चालू आहे. नुकत्याच झालेल्या उपचारांमुळे चेहर्यावरील सूज आणि लालसरपणा कमी झाला असून, डॉक्टरांनी स्थिरतेचे संकेत दिले आहेत.
प्रेमानंद महाराज यांची तब्येत का बिघडली?
प्रेमानंद महाराज यांना बर्याच वर्षांपासून किडनी विकार आहे, ज्यामुळे डायलिसिसची गरज भासते. मागील काही दिवसांत प्रकृती आणखी खालावली, ज्यामुळे चेहर्यावर सूज, डोळे पाणावणे आणि निस्तेजपणा दिसला.