अहमदाबाद : गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. राजकोट इथं पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ समोर आलाय. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचवेळी सतर्क नागरिकांनी या बुडणाऱ्या तरुणाला पाण्यातून बाहेर खेचत त्याचे प्राण वाचवलेत. पुरामुळे राजकोटमधील जनजीवन विस्कळीत झालंय. जागोजागी साचलेल्या पाण्यातून लोक आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन जात असल्याचंही पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडोदरा जिल्हायाला पावसाचा फटका बसल्यानंतर आता जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. दूध आणि भाजीपाला महागलाय. अर्धा लीटर दुधासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. तर भाजीपाला, पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्रं आहे. तर सलग दुसऱ्या दिवशीही ८ गाड्या रद्द करण्यात आल्यात. 



मुसळधार पावसामुळे वडोदऱ्यातील वडसर गावात अनेक घरांत पाणी शिरलंय. एनडीआरएफची एक टीम आणि मांजलपूर पोलिसांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या रेस्क्यूसाठी शर्थीचे प्रयत्न केलेत.