प्रियंका इफेक्ट: एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर तब्बल १० लाख नवीन कार्यकर्ते सामील झाले आहेत. उत्तर प्रदेशात तर कार्यकर्त्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. 

Updated: Mar 9, 2019, 02:04 PM IST
प्रियंका इफेक्ट: एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश title=

लखनऊ : प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झल्याचा फायदा ला मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सोपवण्यात आली होती. यानंतर काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर तब्बल १० लाख नवीन कार्यकर्ते सामील झाले आहेत. उत्तर प्रदेशात तर कार्यकर्त्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या दीड लाखावरून साडेतीन लाखांवर गेली आहे.

प्रियंका गंधींनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर फक्त उत्तर प्रदेशच नाही तर अन्य राज्यातही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू काँग्रेसचा बालेकिल्ला नसतानाही तब्बल २५०००० नवीन बूथ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या चार आठवड्यांत काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांची संख्या ५.४ कोटीवरून ६.४ कोटींपर्यंत पोहोचली आहे. २३ जानेवारी रोजी प्रियंका गांधींना पूर्व उत्तर प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी सूत्रे हातात घेतली होती.

काँग्रेसच्या डाटा अॅन्लेटिक्स टीम प्रमुखांच्या माहितीनुसार 'प्रियंका गांधींच्या प्रवेशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे बुथ कार्यकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शक्ती मोबाईल अॅपच्या द्वारे कार्यकर्त्यांचा संख्येत वाढ झाली. प्रियंका गांधींनी अद्याप जनतेला संबोधित केलेले नाही. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रियंका गांधींनी सर्व सभा स्थगित केल्या होत्या. नुकताच लखनऊमध्ये स्थापित केलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रियंका गांधी जनतेच्या त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करत असतात.'