मुंबई : शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खात्याची गरज असते. डिमॅट खाते मेंटेन करण्याचा दरवर्षाला चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे तुमचे डिमॅट अकॉऊंट ऍक्टिवेट असेल तर, तुम्ही त्याला बंद करू शकता. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की डिमॅट अकॉऊंट बंद करायचे कसे? पुढे दिलेल्या टिप्स वापरून सोप्या पद्धतीने तुम्ही डिमॅट अकॉऊंट बंद करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिमॅट अकॉऊंट बंद कसे करावे?
सर्वात आधी ऑनलाईन पद्धतीने अकॉऊंट क्लोजर फॉर्म डाऊनलोड करा. त्या फॉर्मला पूर्ण भरा. त्यानंतर डिपॉजिटरी पार्टिसिपेंट अधिकारी समोर या फॉर्मवर सही करा.


बंद करताना या कागदपत्रांची गरज
तुमचे आयडी किंवा डिपी आयडी, केवायसी डिटेल्स, नाव आणि पत्त्याची माहिती डिमॅट अकॉऊंट बंद करण्याचे कारण बँक अधिकाऱ्यातर्फे वेरिफाइड आयडी


या सर्व कागदपत्रांच्या मदतीने आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन बंद करता येते. याशिवाय जर तुमच्या डिमॅट अकॉऊंटमध्ये होल्डिंग्स आहेत. तर त्याची सुद्धा प्रक्रिया आहे.


होल्डिंग्स असताना कसे बंद करावे डिमॅट
अकाऊंट क्लोजर फॉर्म डाऊनलोड करा आणि भरा
डिलिवरी ट्रान्सॅक्शन स्लिप भरा आणि आपल्या दुसऱ्या डिमॅट अकाऊंटमध्ये होल्डिंग ट्रान्सफर करा.
नवीन अकॉऊंटमधून क्लाइंट मास्टर रिपोर्ट जमा करा
आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन फॉर्म जमा करा.


कोणताही चार्ज लागत नाही
डिमॅट अकॉऊंट बंद करण्यासाठी कोणताही चार्ज लागत नाही. 
डिमॅट अकाऊंट बंद करण्यासाठी ऑनलाईन मेल किंवा रिक्वेस्ट टाकल्याने अकाऊंट बंद होत नाही. यासाठी  आपल्याला बँकेच्या शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.


एकदा फॉर्म भरणे आणि बँकेत जमा केल्यानंतर 7 ते 10 वर्किंग डेजमध्ये तुमचे डिमॅट अकाऊंट बंद होईल.