'तीन तलाक'च्या निर्णयावर अखेर राहुल गांधी बोलले

'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.

Updated: Aug 22, 2017, 08:37 PM IST
'तीन तलाक'च्या निर्णयावर अखेर राहुल गांधी बोलले

नवी दिल्ली : 'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लगेचच प्रतिक्रिया देऊन या निर्णयाचं स्वागत केलं. यानंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

तीन तलाकला सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बंदीचं मी स्वागत करतो. ज्या महिलांनी यासाठी लढा दिला त्यांचं मी अभिनंदन करतो, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.