Word Fight Between Rahul Gandhi and Ravneet Singh Bittu: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. संसदेबाहेर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. संसेदचं कामकाज सुरु होण्यापूर्वी झालेल्या निदर्शनादरम्यान, राहुल गांधींनी काँग्रेसच्या माजी नेत्याला 'देशद्रोही मित्र' असं संबोधलं. प्रत्युत्तरात बिट्टू यांनी राहुल गांधींना 'देश का दुश्मन' (देशाचा शत्रू) असं म्हटलं. तीन वेळा खासदार राहिलेले आणि रेल्वे राज्यमंत्री असलेले बिट्टू यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
जेव्हा काँग्रेसचे खासदार मकर द्वाराजवळ निदर्शन करत होते, तेव्हा हा वाद झाला. रवनीत सिंह बिट्टू जवळून जात असताना राहुल गांधी म्हणाले, "हे पहा एक देशद्रोही इथूनच जात आहे. त्यांचा चेहरा बघा." त्यानंतर त्यांनी बिट्टू यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत म्हटलं, "नमस्कार मित्रा. माझा देशद्रोही मित्र. काळजी करू नकोस, तू परत येशील (काँग्रेसमध्ये)."
राहुल गांधींशी हस्तांदोलन करण्यास नकार देत मंत्री म्हणाले, "देशाचे शत्रू." यापूर्वी त्यांनी आंदोलन करणाऱ्या खासदारांवर टिप्पणी केली होती की, "ते असे बसले आहेत, जणू काही त्यांनी युद्ध जिंकलं आहे."
#WATCH | Delhi: As Union MoS Ravneet Singh Bittu passes by the protesting Congress MPs at Makar Dwar, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Here is a traitor walking right by. Look at the face..."
LoP Rahul Gandhi offered to shake his hands, saying, "Hello brother, my traitor… pic.twitter.com/5wMgjM8KAW
— ANI (@ANI) February 4, 2026
राहुल गांधींनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता, त्याला नकार देणाऱ्या बिट्टू यांनी नंतर गांधी कुटुंबावर ऑपरेशन ब्लू स्टार आणि शीखविरोधी दंगलींवरून जोरदार टीका केली. ऑपरेशन ब्लू स्टार ही 1984 मध्ये सुवर्ण मंदिराच्या परिसरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केलेली लष्करी कारवाई होती.
बिट्टू म्हणाले, “जेव्हा त्यांनी हात पुढे केला, तेव्हा मी म्हणालो, 'तुम्ही देशद्रोही आणि राष्ट्राचे शत्रू आहात, जे दररोज सैन्य आणि देशाबद्दल वाईट बोलतात. एक सरदार गांधी कुटुंबाच्या वंशजाशी, शिखांच्या मारेकऱ्याशी कधीही हस्तांदोलन करणार नाही”.
शीख आमदार आणि दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शीख मंत्र्यांविरुद्ध (बिट्टू) गांधींच्या देशद्रोही या टिप्पणीचा निषेध केला. "राहुल गांधी आणि गांधी कुटुंबच देशद्रोही आहेत. शीख आणि सरदार देशद्रोही असू शकत नाहीत. या विधानावरुन काँग्रेसच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला नाही हे दिसत आहे," असे ते म्हणाले.
काँग्रेसनेही राहुलं गांधींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, आणि विश्वासघातकी व्यक्तीसाठी दुसरा कोणताही शब्द योग्य नसल्याचे म्हटलं. "जेव्हा विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाही, तेव्हा आम्ही काय करू शकतो? बिट्टूला खासदार कोणी बनवलं? विश्वासघातकी व्यक्तीबद्दल आपण आणखी काय म्हणू शकतो?" असं काँग्रेसचे खासदार अमरिंदर राजा वारिंग म्हणाले.
लोकसभेतून आठ विरोधी सदस्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार आंदोलन करत होते. सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकल्याबद्दल या आठ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते.
या खासदारांमध्ये काँग्रेसचे सदस्य हिबी एडन, अमरिंदर सिंग राजा वारिंग, मणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, प्रशांत यादोराव पाडोले, चामला किरण कुमार रेड्डी आणि डीन कुरियाकोस, तसेच सीपीएमचे खासदार एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 175/7
|
VS |
PAK
114(18 ov)
|
| India beat Pakistan by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 205/6
|
VS |
BRN
154/8(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 199/4
|
VS |
NAM
168/6(20 ov)
|
| USA beat Namibia by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.