Indian Railways Train Ticket Rules: ट्रेनने प्रवास करताना कधीकधी अचानक प्रवास रद्द करावा लागतो किंवा त्या प्रवासाची तारिख दुसऱ्या दिवसावर जाते. अशा प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. भारतीय रेल्वे लवकरच या प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळं कन्फर्म तिकीटावरील प्रवासाची तारिखदेखील बदलू शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर रेल्वे गांभीर्याने विचार करत असून लवकरच हा नियम लागू केला जाणार आहे.
अनेकदा नागरिकांचा प्रवासाची तारिख बदलली जाते. अशावेळी त्यांना तिकीट रद्द करुन पुन्हा नव्या तारखेसह बुकिंग करावी लागते. त्यामुळं नव्या बुकिंगचा खर्चदेखील वाढतो. तसंच, जुन्या तिकीटाते कॅन्सलेशन चार्जदेखील कट होतात. अनेकदा प्रवाशांना तिकीट रद्द केल्यानंतर दुहेरी नुकसान सोसावे लागते.
नवीन प्रस्तावानुसार प्रवाशांना त्यांचे कन्फर्म तिकीटाची तारिख ऑनलाइन पद्धतीने बदलता येणार आहे. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या दिवसाचे प्रवासाचे तिकीट काढले आहे. पण काही कारणास्तव ती तारीख बदलावी लागली तर तु्म्ही ते तिकीट दुसऱ्या दिवसासाठी रिशेड्युल करु शकता. ही सुविधा पूर्णपणे डिजीटल असेल आणि प्रवाशी ही सुविधा IRCTC ची वेबसाइट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून करु शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या व्यवस्थेनुसार प्रवाशांचे तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. मात्र, आता हा नियम कधीही बदलू शकतो. अशातच रेल्वे एक सोपी प्रक्रिया लागू करणार आहे. यामुळं लोकांना कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार आहे.
प्रवाशांना नव्या तारखेनुसार प्रवास करायचा असेल तर ट्रेनमध्ये सीटच्या उपलब्धततेनुसारच सीट कन्फमेशन मिळणार आहे. म्हणजेच त्या तारखेला ट्रेनच्या सीट खाली असतील तरच तुमचं तिकीट त्या तारखेसाठी मान्य होणार आहे. तसंच, नव्या तारखेचा तिकीट भाडे जुन्या बुकिंगपेक्षा अधिक असेल तर प्रवाशांना फक्त त्या अंतराचे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे.
सध्याच्या नियमांनुसार, जर एखादा प्रवासी ट्रेन निघण्याच्या 48 किंवा 12 तास आधी तिकीट कॅन्सल करतो. तर त्याच्या तिकीट दरातील 25 टक्के हिस्सा कापला जातो. तर, 12 ते 4 तासांत तिकीट कॅन्स केल्यानंतर चार्ज आणखी वाढतो. तसंच, चार्ट बनवल्यानंतर तिकीट रद्द केली जाते तर रिफंड मिळत नाही. यामुळं दरवर्षी लाखो प्रवाशांना याचा फटका बसतो. मात्र नवीन नियम लागू झाल्यानंतर प्रवाशांना या आर्थिक नुकसानीपासून दिलासा मिळेल.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More
LIVE|
UAE
239/9(50 ov)
|
VS |
NEP
148/3(34.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.