इंदोरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, त्याप्रमाणे नवे खुलासे होत आहेत. यादरम्यान आणखी एक खुलासा झाला आहे, ज्यानुसार सोनमने लग्नाच्या तीन दिवसानंतरच राजाची हत्या करण्याचा कट आखला होता. राज कुशावाहा आणि सोनम यांच्या चॅटमधून हा खुलासा झाला आहे. चॅटमधून झालेल्या खुलाशानुसार, सोनमने लग्नाच्या तीन दिवसांनंतर राज कुशावाहाची हत्या करण्याची चर्चा सुरु केली होती. लग्नानंतर सोनमला पती रघुवंशी आपल्या जवळ येत असल्याचं आवडत नव्हतं.
सोनमने राज कुशवाहासह केलेल्या चॅटमध्ये लिहिलं होतं की, तिचा पती राजा तिच्या जवळ येत होता जे तिला अजिबात आवडत नव्हतं. लग्नाआधी सोनम राजापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. यातच तिने राज कुशवाहासह राजाला मेघालयात मारण्याचा प्लान आखला होता.
सोनम आणि राजा यांनी जाणुनबुजून मेघालयाची निवड केली होती. दोघांनी एखाद्या दूर ठिकाणी नेऊन राजाची हत्या करायची होती. सध्या सोनमने गाजीपूरमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. सध्या तिला मेघालय पोलीस शिलाँगला नेत आहे. 11 मे रोजी इंदोरमध्ये सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं. 20 मे रोजी ते दोघे मेघालयला मधुचंद्रासाठी रवाना झाले. 23 मे रोजी दोघे बेपत्ता झाले होते.
2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह मेघायलातील सोहरा परिसरात एका खोल दरीत सापडला. राजाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.
सोनम गाझीपूरला कशी पोहोचली हे अद्याप उघड झालेलं नाही. सोनम ज्या ढाब्यावर सापडली तिथे जवळच एक टोल नाका आहे. अशाच पोलीस तेथील सीसीटीव्हीच्या आधारे याचा माग काढत आहे. याशिवाय गाझीपूर शहर आणि बाहेरच्या ठिकाणांवर लागलेल्या सीसीटीव्हींच्या आधारे सोनम कोणत्या गाडीतून आली? तिला कोणी सोडलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.