मुंबई : Brokerage Report on Titan: त्रैमासिक निकालानंतर, टायटन स्टॉक पुन्हा अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्यांच्या रडारवर आला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमध्ये 11 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : Brokerage Report On Titan:डिसेंबर तिमाही निकालानंतर, अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्या राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉक टायटनवर गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 5 टक्के शेअर्स आहेत. काल कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल सादर केले,  त्यामध्ये कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त नफा सादर केला.


Macquarieने दिले टार्गेट
मॉर्गन स्टॅनली, मॅक्वेरी, जेपी मॉर्गन, जेफरीज या ब्रोकरेज कंपन्यांनी टायटनवर त्यांचे ब्रोकरेज अहवाल प्रसिद्ध केले आहेत. यापैकी मॅक्वेरीने सर्वाधिक टार्गेट दिले आहे. मॅक्वेरीने टायटनवर गुंतवणूकीसाठी 3350 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. टायटनचे डिसेंबर तिमाहीचे निकाल कसे होते ते प्रथम जाणून घेऊ.


टायटनचे त्रैमासिक निकाल
टाटा समूहाची ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी टायटन कंपनी लिमिटेडचा नफा डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 91 टक्क्यांनी वाढून 1,012 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न 10,094 कोटी रुपये झाले.


ब्रोकरेज कंपन्यांचे मत
Morgan Stanleyने ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवले आहे. खरेदीचे लक्ष्य 2720 रुपये आहे.
Macquarieने ओव्हरवेटचे रेटिंगही कायम ठेवले आहे. खरेदीचे लक्ष्य 3350 रुपये आहे.
JP Morgan ने neutralने न्यूट्रलचे रेटिंग कायम ठेवले आहे आणि लक्ष्य 2700 रुपयांवरून 2800 रुपये ठेवले आहे.
Jefferiesने होल्डचे रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत 2300 रुपयांवरून 2600 रुपये केले आहे.
HSBC ने गुंतवणूकीसाठी 3050 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.