तुमच्या पाकिटातलं 10 रुपयांचं नाण नाही राहीलं वैध? देशभरातील चर्चांवर RBI ने काय म्हटलंय? जाणून घ्या!

10 rupee coin: रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने 10 रुपयांच्या नाण्यांबाबत महत्वाची अपडेट दिलीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 7, 2025, 06:24 PM IST
तुमच्या पाकिटातलं 10 रुपयांचं नाण नाही राहीलं वैध? देशभरातील चर्चांवर RBI ने काय म्हटलंय? जाणून घ्या!
10 रुपयांचं नाणं

10 rupee coin: 10 रुपयांचं नाणं आपल्या प्रत्येकाच्याच खिशात असेल. आपण दैनंदिन व्यवहारात याचा वापर करतो. असं असताना काही व्यापाऱ्यांकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यात येत नसल्याचे दिसून आलंय. त्यामुळे 10 रुपयांची नाणी बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने 10 रुपयांच्या नाण्यांबाबत महत्वाची अपडेट दिलीय. काय आहे नेमका प्रकार? आरबीआयने काय अपडेट दिलीय? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

विविध डिझाइन्सची नाणी

आरबीआयने अफवांच्या पूर्णविराम देत सर्व नाणी कायदेशीर असल्याचे जाहीर केलंय. वेगवेगळ्या डिझाइन्समुळे निर्माण होणारा गोंधळ दूर करण्यासाठी आरबीआयने जनतेला सावध राहण्याचे आवाहन केलंय.
10 रुपयांच्या नाण्याच्या लाँचिंगपासून आरबीआयने 14 पेक्षा जास्त डिझाइन्स जारी केली आहेत. देशभरातून होत असलेली मागणी लक्षात घेऊन नवीन नमुने सादर केले जातात. डिझाइन बदलले तरी सर्व नाणी कायदेशीर चलन म्हणून वैध राहतात, असे आरबीआयने स्पष्ट केलंय. 

रुपया चिन्हाचा गोंधळ

2011 मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे रुपयाचे चिन्ह (₹) जारी केले. या तारखेनंतरच्या नाण्यांवर हे चिन्ह दिसते, तर त्यापूर्वीच्या नाण्यांवर चिन्ह दिसत नाही. यामुळे ₹ चिन्ह नसलेली नाणी बनावट" अशी अफवा पसरली, विशेषतः 2016 च्या नोटाबंदीच्या काळात ही अफवा वाढली.

आरबीआयचे स्पष्टीकरण

सर्व 10 रुपयांची नाणी स्वीकारली जावीत. मग त्यांचे डिझाइन कसेही असो किंवा रुपया चिन्ह असो वा नसो, सर्व नाणी पूर्णपणे कायदेशीर आहेत. बाजारात सर्व नाणी संकोच न करता स्वीकारली जावीत, असे आरबीआयने स्पष्ट केलंय. 

अफवांचा प्रसार 

काही व्यक्ती जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून जनता आणि व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. जुन्या आणि नव्या डिझाइन्सची नाणी एकाच वेळी चलनात असणे स्वाभाविक आहे, परंतु याचा गैरफायदा घेतला जात आहे.

आरबीआयची कायदेशीर निविदा

10 रुपयांचे नाणे स्वीकारणे बंधनकारक आहे. ते नाकारणे बेकायदेशीर आहे. आरबीआयने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी नाणे नाकारल्यास त्यांना याबाबत माहिती द्यावी.

जनजागृतीचे आवाहन

आरबीआयने नागरिकांना व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्यास सांगितले. "हे नाणे 100% वैध आहे," असे ठामपणे सांगून जनता आणि व्यापारी यांनी नाणी स्वीकारावीत, असे आवाहनही केले.

FAQ

प्रश्न: १० रुपयांच्या नाण्यांबाबतच्या अफवांचे कारण काय आहे?

उत्तर: २०११ मध्ये भारत सरकारने रुपयाचे चिन्ह (₹) जारी केल्यानंतर नवीन नाण्यांवर हे चिन्ह दिसते, तर त्यापूर्वीच्या नाण्यांवर नाही. यामुळे "चिन्ह नसलेली नाणी बनावट" अशी अफवा पसरली, विशेषतः नोटाबंदीच्या काळात (२०१६) ती वाढली. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, सर्व १० रुपयांची नाणी, डिझाइन किंवा चिन्ह असो वा नसो, कायदेशीर आहेत.

प्रश्न: १० रुपयांच्या नाण्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्सबाबत काय माहिती आहे?

उत्तर: आरबीआयने १० रुपयांच्या नाण्याच्या लाँचिंगपासून १४ पेक्षा जास्त डिझाइन्स जारी केली आहेत. विविध प्रसंग, मान्यवरांचे स्मरण आणि सार्वजनिक मागणीनुसार नवीन नमुने सादर केले जातात. डिझाइन बदलले तरी सर्व नाणी कायदेशीर चलन म्हणून वैध राहतात आणि बाजारात स्वीकारली जावीत.

प्रश्न: १० रुपयांचे नाणे नाकारणे बेकायदेशीर आहे का?

उत्तर: होय, १० रुपयांचे नाणे स्वीकारणे बंधनकारक आहे आणि ते नाकारणे बेकायदेशीर आहे. आरबीआयने सर्व नाणी कायदेशीर निविदा असल्याचे जाहीर केले आहे. जर कोणी नाणे नाकारले तर त्यांना याबाबत माहिती द्यावी आणि व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आरबीआयने आवाहन केले आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More