खिशातल्या नोटेवर 'स्टार' असं चिन्ह दिसल्यास काय समजावं? ही नोट खोटी आहे?

Unique Currency Notes RBI : तुमच्याकडेही आहे का अशी नोट? तिचं काय करावं? गोंधळून जाऊ नका. आधी पाहा ही कामाची माहिती...   

सायली पाटील | Updated: Jun 4, 2025, 01:02 PM IST
खिशातल्या नोटेवर 'स्टार' असं चिन्ह दिसल्यास काय समजावं? ही नोट खोटी आहे?
RBI currency notes star series note meaning know latest update

Unique Currency Notes RBI : केंद्रीय बँक म्हणून ओळखल्या असणाऱ्या भारतातील रिजर्व बँकेनं आतापर्यंत अनेक नोटा चलनात आणल्या आहेत. अगदी एक रुपयापासून ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटा इतकंच काय तर 1000 आणि 2000 रुपयांच्या नोटासुद्धा चलनात आणण्याचं काम आरबीआयनं केलं. 

Add Zee News as a Preferred Source

आतापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेनं चलनात आणलेल्या नोटा या त्यांच्या वेगळेपणामुळं आणि उल्लेखनीय रचनेमुळंही चर्चेत आल्या. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दरवर्षी अर्थव्यवस्थेला अनुसरून आरबीआयकडून नोटांची छपाई केली जाते. प्रत्येक नोट ही वेगळी आणि खास असते. कोणत्याही नोटेवर छापण्यात आलेलाय क्रमांक एकसारखा नसतो. काही नोटा या खास असतात. 

अनेकदा नोटांवर छापलेला क्रमांक इतका कमाल असतो, की काही मंडळी अशा नोटा जपून ठेवतात. तर, काही मंडळी मात्र नोटेवर अनपेक्षित गोष्टी दिसल्यास दचकून जातात. आपलं नुकसान झालं का, आपल्याला कोणी फसवलं का? हे असे प्रश्न त्यांच्या मनात घर करून अनेकांचाच गोंधळ उडून जातो. तुमच्याकडेही अशी एखादी नोट आली आहे का? 

नोटेवर स्टार असल्यास काय समजावं? 

आरबीआयकडून ज्या नोटांची छपाई केली जाते त्यातील काही नोटा स्टार सीरिजच्या असतात. या नोटा अनेकांसाठी खास असतात. मुळात त्यांची छपाई कमी प्रमाणात होत असल्यानं सहजपणे त्या चलनात दिसत नाही, त्यामुळं त्यांना 'रॉयल'ही म्हटलं जातं. या सीरिजची छपाई करताना एका बंडलमध्ये फक्त 100 नोटांवरच स्टार असतो. अगदी सोपं करून सांगावं तर, 1000 मध्ये फक्त 100 नोटाच स्टार सीरिजच्या असतात. 

हेसुद्धा वाचा : मोठ्या संकटाची चाहूल? भारतात सापडला 'तो' प्रलयकारी मासा; चिंतेत भर पडण्याचं नेमकं कारण काय?

 

स्टार सीरिज हा कोणताही खास क्रमांक नसून, क्रमांकांदरम्यान फक्त एका स्टारचा उल्लेख असतो. या नोटा पूर्णपणे योग्य असून, आरबीआयकडूनच छापलेल्या असतात आणि पूर्णत: वापरण्याजोग्य आणि अधिकृत असतात. 2006 पासून आरबीआयनं अशा नोटांची छपाई सुरू करत आरबीआयच्याच माहितीनुसार या रिल्पेस किंवा रिप्रिंटेड नोटा आहेत. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More