नवी दिल्ली : तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो व्यवहार तुम्ही केला नसाल तर घाबरून जायचं कारण नाही, कारण रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या निर्देशांनुसार व्यवहार झाल्यानंतर 3 दिवसांत बँकेच्या शाखेत जाऊन ग्राहकानं तक्रार केल्यास 100 टक्के रक्कम पुढल्या 10 दिवसांत ग्राहकाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र 4 दिवस ते 7 दिवसाच्या कालावधीत तक्रार केल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त 25 हजारांपर्यंत दंड सोसावा लागू शकतो. तसंच ग्राहकाच्या चुकीमुळे रक्कम काढली गेली असेल, तर मात्र ग्राहकाला त्याची भरपाई मिळणार नाही असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.


गेल्या काही दिवसांमध्ये गैरप्रकारानं थर्ड पार्टी ट्रान्झेक्शन झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालीये. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल केलेत.