रेपो रेटमध्ये बंपर घट; 20, 30 आणि 50 लाखांच्या Home Loan वर किती रुपये वाचणार? जाणून घ्या सोपं गणित

Home Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली आणि अनेक सामान्यांना दिलासा मिळाला.

सायली पाटील | Updated: Jun 7, 2025, 01:14 PM IST
रेपो रेटमध्ये बंपर घट; 20, 30 आणि 50 लाखांच्या Home Loan वर किती रुपये वाचणार? जाणून घ्या सोपं गणित
RBI repo rate Cut 50 basis points Repo Rate Check calculation of 20 30 and 50 lakhs Home Loan EMI updates

Home Loan : सामन्यांसाठी मोठा प्रश्न असणाऱ्या कर्ज आणि व्याजदरासंदर्भातील अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय आरबीआयनं नुकताच घेतला. सद्यस्थितीला असणाऱ्या रेपो रेटमध्ये RBI नं 50 बेसिस पॉईंट्सनं घट केली आणि त्यानंतर हे दर 5.50 टक्क्यांवर पोहोचले. ज्यामुळं गृह कर्ज आणि वाहनकर्ज असणाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला. 

Add Zee News as a Preferred Source

आरबीआयनं ही दिलासादायक बातमी जाहीर केल्यानंतर सामान्यांनी थेट त्यांचा कर्जाचा हफ्ता किती रुपयांनी घटणार याचीच तपासणी केली. तिथं बँकांनीसुद्धा रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर कर्जाचे व्याजदर कमी केले. बँकांच्या या निर्णयानंतर आता पाहा 20, 30 आणि 50 लाखांच्या कर्जावरील व्याजदरात नेमकी किती कपात झाली आहे. 

50 लाखांच्या कर्जावर किती रुपये वाचणार? 

एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृहकर्ज अर्थात होम लोन 30 वर्षांसाठी घेतलं असून त्यावर ही व्यक्ती 9 टक्के व्याजदरानं कर्जाचा हफ्ता फेडत असल्यास त्यासाठी दर महिन्याला 40231 रुपये मोजावे लागतात. आता आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर हा कर्जाचा हफ्ता 38446 रुपयांवर येईल. म्हणजेच दर महिन्यासला साधारण 1785 रुपयांची बचत. 

30 लाखांच्या कर्जावर किती बचत होणार? 

एखाद्या व्यक्तीनं जर 8.5 टक्के व्याजदरानं 30 लाखांचं कर्ज 20 वर्षांसाठी घेतलं असल्यास प्रत्यक्षात ही व्यक्ती 26035 रुपये इतका कर्जाचा हफ्ता भरत असेल. मात्र आता व्याजदर कपातीनंतर व्याजदर 8 टक्क्यांवर पोहोचणार असून, ईएमआयसाठी आता महिन्याला 25093 रुपये इतका असेल. 

25 आणि 20 लाखांच्या कर्जावर किती बचत होणार? 

25 लाखांचं कर्ज 20 वर्षांसाठी घेतलं असल्यास सध्या 8.5 टक्के व्याजदरानं 21696 इतका हफ्ता एखादी व्यक्ती भरते. मात्र आता याच व्यक्तीचे 785 रुपये बचतीत राहणार असून त्यांचा हफ्ता 20911 रुपयांवर पोहोचेल. 

20 लाखांच्या कर्जावरही होणार बचत 

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर 20 वर्षांसाठी घेतलेल्या 20 लाखांच्या कर्जासाठी एखादी व्यक्ती 9 टक्के व्याजदरानं कर्ज फेडत असल्यास त्या व्यक्तीला दर महिन्याला 17995 रुपयांचा हफ्ता भरावा लागत असून, इथून पुढं या व्यक्तीची 639 रुपये बचत होणार असून कर्जाचा हफ्ता 17356 रुपये इतका असेल. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More