सोनं-चांदीवर कर्ज घेताय? RBIकडून नियमांत बदल; तुमचा फायदा की नुकसान, जाणून घ्या!

RBIs New Gold Loan Rules: बँकेत सोनं तारण ठेवताय? लवकरच नियमांत होणार मोठे बदल जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 12, 2025, 12:46 PM IST
सोनं-चांदीवर कर्ज घेताय? RBIकडून नियमांत बदल; तुमचा फायदा की नुकसान, जाणून घ्या!
RBIs New Gold Loan Rules Heres How The Latest Guidelines

RBIs New Gold Loan Rules: सोनं हा सुरक्षीत गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. भारतात फक्त हौसेसाठीच नाही तर अडीअडचणीच्या काळातही सोन्याचा वापर करता येतो. अगदी अडचणींच्या काळातही सोनं बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेता येते. मात्र आता सोनं-चांदीवर कर्ज घेण्याच्या नियमांत बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या सप्ताहात एलटीव्ही रेशो वाढवण्यासंदर्भात सोनं व चांदी यांच्या तारण कर्जाशी संबंधित 8 नियमांत बदल केला आहे. नवे नियम सर्व व्यावसायिक बँका, बिगर बँक वित्तीय संस्था (एनबीएफसी), सहकारी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना लागू असमार आहेत. तसंच, या नव्या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. 

काय आहेत नियमातील बदल?

- सोन्याच्या किंमतीत 85 टक्के कर्ज मिळेल. 

- उत्पन्नाचा पुरावा व क्रेडिट स्कोअर यांची 25 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी गरज राहणार नाही.

- मुद्दल व व्याज मुदतीच्या शेवटी भरण्यासाठी 12 महिन्यांची मुदत निश्चित

- सोनं-चांदी तारण ठेवण्याची कमाल मर्यादा सोन्याचे दागिने - 1 किलो, सोन्याचे शिक्के-50 ग्रॅम, चांदीचे दागिने-10 किलो. 

- कर्ज बंद झाल्यानंतर 7 दिवसांच्या कामकाजाच्या दिवसांत सोनं-चांदी परत न केल्यास ग्राहकांना दररोज 5 हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. 

- सोनं-चांदी चोरी झाल्यास किंवा खराब झाल्यास पूर्ण भरपाई मिळणार आहे. 

- कर्ज न फेडल्यास सोन्याचा लिलाव करण्याआधी ग्राहकास नोटीस द्यावी लागणार आहे. 

- कर्जाच्या अटी त्या राज्यातील स्थानिक भाषेत असतील 

आजचा सोन्याचा दर काय?

आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या तणाव आणि कमजोर डॉलर यामुळं पुन्हा सोन्याची चमक वाढली आहे. त्याव्यतिरिक्त अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं 880 रुपयांनी महागलं आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 99,280 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 800 रुपयांनी महागला असून 91,000 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून सोनं 74,460 रुपयांवर पोहोचलं आहे.