सलमान, तारिक अन् i20 कार...; दिल्ली स्फोटामागचे पुलवामा कनेक्शन उघड, मिळाला महत्त्वाचा क्लू

Delhi Red Fort Blast:दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 11, 2025, 07:14 AM IST
सलमान, तारिक अन् i20 कार...; दिल्ली स्फोटामागचे पुलवामा कनेक्शन उघड,  मिळाला महत्त्वाचा क्लू
Red Fort Blast Hyundai i20 car was from Gurugram former owner Mohammad Salman pulwama connection

Delhi Red Fort Blast: लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाप्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गुरुग्राम येथील होती. या कारचा आधीचा मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Add Zee News as a Preferred Source

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि फॉरेन्सिक टीमने कारच्या उद्ध्वस्त झालेल्या तुकड्यावरुन नंबर ट्रेस केला होता. त्यानंतर ही गाडी गुरुग्राम येथून रजिस्टर असल्याचे समोर आले. तसंच, कारच्या मालकाचे नाव मोहम्मद सलमान असल्याचेही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने ही कार कोणाला विकली होती याची चौकशी सुरू असून त्याचे कोणत्याही संघटनेशी संबंध आहेत का? याचा तपास करण्यात येत आहे. 

चौकशीत सलमानने सांगितले की, त्याने कार साधारणपणे दीड वर्षांपूर्वी दिल्लीच्या ओखला येथे राहणाऱ्या देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. तसंच, कार विकल्याचे सगळे कागदपत्रे गुरुग्राम पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तसंच, हीच कार पुलवामाच्या तारिक नावाच्या व्यक्तीलाही विकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर देवेंद्रनेदेखील ही कार हरियाणातील अंबाला नावाच्या एका व्यक्तीला विकण्यात आली. सध्या अंबाला पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. जेव्हा स्फोट झाला तेव्हा कार कोणाकडे होती आणि ती दिल्लीत कोणी आणली, याचा शोध घेण्यात येत आहे.

पुलवामा कनेक्शन

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचं पुलवामा कनेक्शन उघडकीस आलंय. जम्मू-काश्मीरमधील दोघांची नावं उघड झालीत.तारिक आणि उमर मोहम्मद अशी या दोघांची नावे आहेत.. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार ही तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांवरही UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांकडून तपास सुरू

कारसंदर्भातील कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाला होता की नाही याचा तपास पोलिस करत आहे. गुरुग्रामवरुन कार दिल्लीत कशी पोहोचली आणि या कटात किती जण सहभागी आहेत, याचा शोध तपास यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. तसंच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कारची नंबर प्लेट आणि इंजिन नंबरवरुन सुरुवातीचे धागेदोरे हाती लागले आहेत. आता स्फोट झाला तेव्हा ही कार कोणाच्या ताब्यात होती याचा शोध घेणे बाकी आहे. NIA आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीम मिळून या प्रकरणाचा तपास करत आहे. प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागे एखाद्या संघटनेचा हात असू शकतो, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More