Delhi Red Fort Blast: भारताच्या राजकारण आणि इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या दिल्लीतील लाल किल्ला परिसरानजीक असणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ सोमवारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती, की नजीकच्या भागात मोठा आवाज झाला, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि लोक सैरावैरा पळू लागले. सदर घटनेचं गांभीर्य पाहता देशातील गुप्तचर यंत्रणेपासून तपास यंत्रणाही सज्ज झाल्या आणि देशातील प्रमुख शहरांसह सर्व तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला.
दिल्लीतील स्फोटानंतर सोशल मीडियावर या घटनेच्या अवतीभोवती फिरणारे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. काहींनी हे फोटो आपल्या स्टोरी आणि स्टेटसमध्ये ठेवले. याचदरम्यान काही सोशल मीडिया अकाऊंटवरून चुकीच्या पद्धतीन या घटनेवर भाष्य करण्यात आलं, जिथं समाजाची दिशाभूलही करण्याता प्रयत्न झाला. त्याचसंदर्भात सरकारनं पुढाकार घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारासुद्धा दिला.
सोशल मीडियावर दिल्लीत झालेल्या स्फोटाचा एक विध्वंसक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये स्फोटाची तीव्रता अतिप्रचंड असून, मोठा हल्ला होऊन धूर अन् आगीचे लोट उसळतात त्याचप्रमाणे धडकी भरवणारं दृश्य दिसेल असा एक फोटो काही अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हा फोटो दिल्लीतील मूळ घटनेचा नसून, काही Accounts वरून हेतूपुस्सर तो चुकीचा फोटो व्हायरल केला जात आहे. प्रत्यक्षात हा फोटो 2024 मधील लेबनॉन येथे झालेल्या स्फोटांचा असून सदर घटना नेमकी काय होती, याची सविस्तर माहिती देणारी बातमी PIBfactcheck च्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.
Some propaganda accounts are circulating an old image on social media, falsely claiming it to be linked with blast in Delhi#PIBFactCheck:
The image is from a 2024 blast in Lebanon, not from #Delhi
Always verify such claims through credible… pic.twitter.com/g0IeypSy34
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 10, 2025
दिल्लीत झालेला स्फोट आणि तत्सम संवेदनशील घटनांचं गांभीर्य, त्याचा समाजमनावर होणारा परिणाम आणि एकंदरच परिस्थिती पाहता अशा कोणत्याही प्रसंगी काहीही पोस्ट करण्यापूर्वी किंवा त्यावर भाष्य करण्यापूर्वी अधिकृत सूत्रांमार्फत या गोष्टींची पुनर्पडताळणी करा असा इशारा सरकारनं नागरिकांना दिला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोट नेमका काय होता?
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या ह्युंडाई i20 कारमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजता एक भयंकर स्फोट झाला. या स्फोटामुळे जवळपासच्या वाहनांना आग लागली आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले?
वेगवेगळ्या अहवालांनुसार, या स्फोटात कमीत कमी 8 ते 13 लोकांचा मृत्यू झाला असून, 20 ते 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
स्फोटाचे कारण काय असू शकते?
प्राथमिक तपासानुसार, हा स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. कारमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे संकेत मिळाले असून, पुलवामा जिल्ह्यातील एका व्यक्तीशी जोडले जाणारे वाहन ट्रेस करण्यात आले आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
WI
153/4(45.3 ov)
|
VS |
NZ
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.