याला म्हणतात नशीब! घरात साफसफाई करताना सापडली 36 वर्षांपूर्वीच्या Reliance शेअरची कागदपत्रं, आजची किंमत थक्क करणारी

RIL Reliance Shares : शेअर बाजार कोसळला, शेअर बाजारात अमुक रुपयांची घसरण.... या आणि अशा कैक वृत्तांनी गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना घाम फोडला आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 12, 2025, 10:03 AM IST
याला म्हणतात नशीब! घरात साफसफाई करताना सापडली 36 वर्षांपूर्वीच्या Reliance शेअरची कागदपत्रं, आजची किंमत थक्क करणारी
reliance ril shares found in house during cleaning chandigarh rattan dhillon stock market

RIL Reliance Shares : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक जोखमीची असून नियम व अटी लक्षपूर्वक वाचून घ्या... अशा स्पष्ट सूचना इथं गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकालाच दिल्या जातात. त्यातच मागील काही वर्षांमधील शेअर बाजाराचा आलेख पाहायचा झाल्यास सातत्यानं होणारी घसरण पाहता नफा नेमका कुठून आणि कमवायचा याचसाठी कुशल मंडळीसुद्धा डोकं लावताना दिसत आहेत. अनेकांनी तर, शेअर बाजाराती पडझड पाहता या क्षेत्राकडे पाठच फिरवली आहे. पण, एक व्यक्ती अशीही आहे, ज्यांना नशीबच या शेअर बाजाराकडे घेऊन आलं आहे. इतकंच नाही, तर साक्षात धनलक्ष्मीचा लाभही या व्यक्तीला झाला आहे. 

सध्या शेअर बाजार, एसआयपी, म्युच्युअल फंड यांमधील गुंतवणुकीविषी जितकी समज सामान्यांनाही आली आहे, तितकी समज साधारण दोन दशकांपूर्वी नव्हती आणि ज्यांना थोडीथोडकी समज होती अशा मंडळींनी तेव्हाच्या काळात आपली आवक पाहून त्यानुसार काही शेअर खरेदीसुद्धा केले होते. अशाच एका शेअरधारकाला जवळपास 36 वर्षांनंतर लॉटरी लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. 

नशीबच पालटलं... 

चंदीगढमधील एका कुटुंबावर लक्ष्मी प्रसन्न झाली हे सध्या प्रत्येकजण म्हणताना दिसत आहे. कारण, घराच्या साफसफाईदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे शेअर आणि त्याची काही कागदपत्र रतन ढिल्लों यांना सापडली आणि आजच्या घडीला त्या शेअरची किंमत पाहून त्यांचेही डोळे चमकतील. 

कारची आवड असणाऱ्या रतन ढिल्लों जेव्हा घरता साफसफाई करत होते, तेव्हा त्यांना काही कागदपत्र मिळाली. ज्याणध्ये 1988 मध्ये 10 रुपये प्रति शेअर या दरानं त्यांनी खरेदी केलल्या 30 इक्विटी शेअरची बाब त्यांच्या लर्षात आली. या शेअरची खरेदी ज्या व्यक्तीनं केली ती व्यक्ती आज हयात नाही. शेअर मार्केटसंदर्भातील फारशी माहिती नसल्यानं यानंतर ढिल्लों यांनी शेअरची कागदपत्र X वर शेअर करत याचं पुढे काय करावं असा प्रश्न करत सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांकडून मार्गदर्शन मागितलं. 

हेसुद्धा वाचा : ऐन शिमग्याच्या दिवसांमध्येच रेल्वे विभागाकडून मोठा निर्णय; इथून पुढं फलाटावर... 

ढिल्लों यांची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि या क्षेत्राची माहिती असणाऱ्या अनेकांनीच ही माहिती पडताळली. काही नेटकऱ्यांनी सध्याची शेअर बाजारातील स्थिती पाहता तीन स्टॉक स्प्लीट आणि दोन बोनसनंतर शेअरची किंमत वाढून 960 रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं. ज्यामुळं हे 30 शेअर ढिल्लों यांना साधारण 11 ते 12 लाख रुपये कमवून देतील ही बाब समोर आली. 

काही नेटकऱ्यांनी ढिल्लों यांना हे शेअर डिमॅट खात्यात ट्रान्सफर करून घेण्याची मागणी केली. तर, काहींनी या कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचा सल्ला देत त्यानंतर शेअर ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील असंही सांगितलं. अतिशय अनपेक्षितरित्या ढिल्लों यांना मिळालेली कागदपत्र आणि या शेअरची संख्या पाहता आता त्यांना यातून नेमका कसा लाभ होतो हेच जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.