'XL साईज काँडम आण, मी आता मेसेज डिलीट करते', प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल

Prasanna Shankar Dhivya Shashidhar: रिपलिंग कंपनीचा संस्थापक प्रसन्ना शंकर याने आपली पत्नी दिव्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड केलं असून, त्याचे पुरावेही शेअर केले आहेत. तसंच आपल्याला जाणुनबुजून पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 24, 2025, 09:53 PM IST
'XL साईज काँडम आण, मी आता मेसेज डिलीट करते', प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल

Prasanna Shankar Dhivya Shashidhar: भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत. तसंच चेन्नई पोलीस दिव्या शशिधरच्या बाजूने असून, आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही केला आहे. मी सध्या चेन्नई पोलिसांपासून पळ काढत असून तामिळनाडूच्या बाहेर असल्याचं त्याने सांगितलं आहे. तर दुसरीकडे दिव्या शशिधरने प्रसन्नावर "लैंगिक विकृती" आणि "अपहरण" केल्याचा आरोप केला आहे. 

प्रसन्ना शंकर यांनी रविवारी एक्सवर एकामागोमाग एक अनेक पोस्ट शेअर करत पत्नी दिव्यासोबतच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेची माहिती दिली. प्रसन्ना शंकरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला 10 वर्षं झाली असून, त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. दिव्याचे अमेरिकेत सहा महिन्यांपासून अनुप नावाच्या व्यक्तीसोबत सहापेक्षा जास्त महिन्यांपासून प्रेमसंबंध होते आणि प्रियकराच्या पत्नीने त्याला मेसेज केल्यानंतर त्याला हे कळले.

पोस्टमध्ये त्याने पुढे सांगितलं आहे की, "त्यानंतर आम्ही आमच्या घटस्फोटाच्या रकमेसाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल या अटींवर वाटाघाटी करत होतो. ती यावर आनंदी नव्हती. तिने माझ्याविरुद्ध मारहाण केल्याची खोटी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिने आणखी खोट्या तक्रारी केल्या की मी तिच्यावर बलात्कार केला, तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे, ते निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे".

"मी भारतात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटातून अधिक पैसे कमवण्यासाठी तिने अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर तिने तिच्या घटस्फोटाच्या खटल्यात मदत करण्यासाठी माझ्या मुलाला अमेरिकेत पळवून नेले. मी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला आणि न्यायाधीशांनी माझ्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला परत करण्यास सांगितलं", अशी माहिती त्याने दिली आहे. 

दिव्याने त्यांच्या मुलाला अमेरिकेत पळवून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने अमेरिकेतील न्यायालयांमध्ये जाऊन तिला थांबवलं असंही त्याने सांगितलं आहे. मुलाचा समान ताबा देण्यावर सहमती दर्शवली असली तरी तिने मुलाचा पासपोर्ट सादर केला नाही आणि त्याऐवजी त्याच्याविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली असा आरोपही त्याने केला आहे. शंकरने एक्सवर त्याच्या मुलासोबतचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. 

पोलीस आणि माझी पत्नी संयुक्त पत्रकार परिषद घेत माझ्यावर अनेक आरोप करणार आहेत असा दावा त्याने केला आहे. तसंच त्यांनी माझा मित्र गोकुळला माझे सर्व ट्विट खोटे असल्याचं सांगण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे. 

तथापि, दिव्याने हे आरोप फेटाळून लावले असून शंकर हा 'लैंगिक विकृत' असल्याचा आरोप केला आहे. वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर शंकरला अमेरिकेत नोकरी गमवावी लागली असा आरोप दिव्याने केला आहे. शंकर हा एक 'लैंगिक विकृत' असून त्याने गुप्त कॅमेऱ्यांचा वापर करून महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले असा तिचा आरोप आहे. तिने तिच्या सासऱ्यांवरही लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अमेरिकन दूतावास आणि चेन्नई पोलिस तिच्या मुलाला शोधण्यात तिला मदत करत आहेत अशी माहिती तिने दिली आहे.