एका व्हिडीओ सध्या सगळ्यांच मन सुन्न झालं आहे. एका रॉटविलर कुत्र्याने चार महिन्यांच्या बाळावर हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चार महिन्यांच्या बाळाला कुत्र्याने हातातून ओढून घेतलं आणि त्याचा चावा घेतला आहे. हा सगळा प्रकार इतका भयावह आहे की, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत निष्काळजीपणे मृत्यू घडवून आणल्याबद्दल आणि निष्काळजीपणे धोकादायक प्राणी पाळल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. ट्विटर हँडल @gharkekalesh ने २० मे रोजी ही क्लिप शेअर केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की, अहमदाबादमध्ये एका रॉटविलरने हल्ला केल्यानंतर चार महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो युझर्सने त्यांचा संताप आणि दुःख व्यक्त करत आहेत आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
Rotweiller Dog k!lled 4 month old baby girl in Ahmedabad
pic.twitter.com/mvnhpRRbwJ— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 20, 2025
एका वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. मुलीची १७ वर्षांची मावशी हीना तिला सोसायटीच्या मोकळ्या भागात फिरायला घेऊन गेली होती आणि तिथे इतर लोकांशी बोलत होती. त्याच वेळी, सोसायटीत राहणारा आणि पट्ट्याने बांधलेला दिलीप पटेलचा रॉटविलर 'रॉकी' अचानक नियंत्रणाबाहेर गेला. त्याने हीनाला ढकलले, ज्यामुळे ती आणि मूल दोघेही खाली पडले. यानंतर कुत्र्याने मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेल्यानंतर रात्री 11.45 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. हीनाच्या पोटात आणि कंबरेलाही गंभीर दुखापत झाली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुलीचे आजोबा दशरथ चौहान यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. बुधवारी विवेकानंदनगर पोलिसांनी ५० वर्षीय दिलीप पटेल यांना ताब्यात घेतले. पटेल एका खाजगी कंपनीत काम करतो आणि त्याने फक्त दोन महिन्यांचा असताना रॉटविलरला दत्तक घेतले.