सरसंघचालकांकडून अखंड भारताचा पुनरुच्चार; काय म्हणाले? वाचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.   

सायली पाटील | Updated: Oct 6, 2025, 07:33 AM IST
सरसंघचालकांकडून अखंड भारताचा पुनरुच्चार; काय म्हणाले? वाचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
RSS chief Bhagwat took pledge of akhand bharat united India saying Will take Pakistan back some day know details

RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा एका अतीव लक्षवेधी वक्तव्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. सरसंघचालकांकडून अखंड भारताचा पुनरुच्चार करण्यात आला असून, 'आपल्या घरातील एक खोली कोणीतरी हिसकावून घेतलीय आणि ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची आहे', असं ते मध्यप्रदेशातील कार्यक्रमदरम्यान म्हणाले. मोहन भागवतांचा संकल्प सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मध्य प्रदेशातील सतना इथं ठिकाणी मोहन भागवत बोलत होते. सिंधी समाजाचा आपल्याला अभिमान वाटतो, असंही याप्रसंगी म्हणाले. 'सिंधी समाज अखंड भारतात आला होता. ही सवय नव्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे. कारण आपलं राष्ट्र म्हणजे आपलं एक घर आहे. या घराची एक खोली कुणीतरी हिसकावून घेतली. त्या खोलीत टेबल, खुर्ची, कपडेही होते. पण ती खोली बळकवण्यात आली. आता मात्र ती खोली आपल्याला परत मिळवायची आहे', असं वक्तव्य भागवतांनीनी केलं. अखंड भारत हा आपला संकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

परिस्थितीनं आपल्याला त्या घरातून या घरात पाठवलं, कारण ते आणि हे घर वेगळं नाही असं म्हणत अखंच भारताच्या संकल्पनेवर त्यांनी जाणीवपूर्वक वजन टाकलं. यावेळी पाकिस्तानातील सिंध प्रांतात गेलेल्या सिंधी समाजाचाही त्यांनी उल्लेख केला. 'फाळणीनंतर सिंधी बांधव पाकिस्तानात न जाता अखंड भारतात आले. मला आनंद आहे की ते पाकिस्तानात गेले नाहीत. कारण हा एक अखंड भारत आहे', असं ते म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : चक्रीवादळाच्या 'शक्ती'चा महाराष्ट्राला धोका? पुढील 24 तासांत हवामानात नेमके कोणते बदल अपेक्षित?

सामाजिक एकता या संकल्पनेवर प्रकाश टाकत ते म्हणाले, 'आपण सर्वजण एक आहोत. सर्व सनातनी आणि हिंदू आहोत. मात्र इंग्रज आले आणि त्यांनी तुटलेला आरसा दाखवत आपल्याला वेगळं केलं. आज काळाजी गरज आहे आपल्याला पुन्हा एकवटण्याची. इथं आरसा म्हणून अध्यात्मिक परंपरा काम करेल आणि हा आरसा आपले गुरूवर्य दाखवतील', असं विश्लेषण त्यांनी केलं. 

FAQ

मोहन भागवतांनी कुठे आणि कशाबाबत वक्तव्य केलं?
मध्य प्रदेशातील सतना येथे सिंधी समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवतांनी अखंड भारताच्या संकल्पाबाबत लक्षवेधी वक्तव्य केलं. 

अखंड भारताबाबत त्यांचा संकल्प काय आहे?
अखंड भारत हा आपला शेवटचा संकल्प असल्याचं भागवत म्हणाले. फाळणीनंतर परिस्थितीमुळे आपल्याला एका घरातून दुसऱ्या घरात यावं लागलं, पण दोन्ही घरं वेगळी नाहीत. 

सिंधी समाजाबाबत काय म्हटलं?
सिंधी समाजाला अभिमान वाटतो, असं भागवत म्हणाले. फाळणीनंतर सिंधी बांधवांनी पाकिस्तानात जाण्याऐवजी अखंड भारतात येण्याचा निर्णय घेतला. ही सवय नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण राष्ट्र हे एकच घर आहे आणि त्यातील हिसकावलेली खोली (उदा. सिंध) पुन्हा मिळवायची आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More