भारतातील 'या' राज्याच्या आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार; दुसऱ्या नाही तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याचे नाव जाणून शॉक व्हाल

भारतातील कोणत्या राज्याच्या आमदारांना सर्वात जास्त पगार मिळतो.  दुसऱ्या नाही तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याचे नाव जाणून शॉक व्हाल. 

वनिता कांबळे | Updated: Mar 24, 2025, 07:44 PM IST
भारतातील 'या' राज्याच्या आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार; दुसऱ्या नाही तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याचे नाव जाणून शॉक व्हाल

Salary Of MLA In India: भारतात लोकशाही आहे. जनतेने निवडणून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात आमदार सरकार चालवतात आणि जनतेचे प्रश्न सोडवतात. भारतात एकूण 28 राज्य आहेत. प्रत्येक राज्यात आमदारांची संख्या वेगळी आहे.  जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या आमदारांना मानधन म्हणून मासिक वेतन दिले जाते. जाणून घेऊया सर्वात जास्त पगार भारतातील कोणत्या राज्यातील आमदारांना मिळतो. 

विविध राज्यांमध्ये आमदारांना भत्ते मिळून लाखो रुपयांचा पगार मिळतो. पगारासह आमदारांना विविध सुविधा मिळतात. यात निवास, प्रवास यासारख्या अनेक सुविधा मिळतात. कर्नाटक राज्यातील आमदारांनी दुप्पट पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे देशभरातील विविध राज्यातील आमदारांच्या पगाराची चर्चा सुरु झाली आहे.  

सर्वाधिक पगार मिळणाऱ्या राज्याच्या यादीत आपले महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. आमदारांना सर्वाधिक पगार देणारे दुसरे राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात आमदारांना दरमहा 2.6 लाख रुपये वेतन दिले जाते. या यादीत तेलंगणा राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणातील आमदारांना दरमहा अडीच लाख रुपये वेतन दिले जाते. दिल्लीसह संपूर्ण देशात अशी 8 राज्ये आहेत जिथे आमदारांना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो. तर सर्वात कमी पगार हा त्रिपुरा, नागालँड, मणिपूरमधील आमदारांना मिळतो. यांचा पगार हा 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. 

आमदारांना सर्वात जास्त पगार देणाऱ्या राज्यांच्या यादीत ज्या राज्याचे नाव पहिल्या स्थानी आहे ते नाव जाणून सगळेच शॉक होतात.  संपूर्ण देशात सर्वाधिक पगार झारखंडमधील आमदारांना मिळतो. झारखंडमधील आमदारांना दरमहा 2.9 लाख रुपये इतके वेतन दिले जाते. या आमदारांना पगाराव्यतिरिक्त राज्य सरकारकडून भत्ते आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात.