मुकेश अंबानींच्या ड्राईव्हरची सॅलरी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

देशातील सर्वात श्रीमंत ड्राईव्हर

शैलेश मुसळे | Updated: Dec 23, 2020, 08:12 PM IST
मुकेश अंबानींच्या ड्राईव्हरची सॅलरी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल title=

मुंबई : भारतात मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत देखील त्यांचा क्रमांक लागतो. मुकेश अंबानी यांचं घर देखील राजमहलासारखं आहे. जगातील महागड्या घरांमध्ये त्यांच्या घराचा नंबर लागतो. मुकेश अंबानी यांच्याकडे महागडी कार आहे. पण ती गाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची सॅलरी किती हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, मुंकेश अंबानी त्यांच्या ड्रायवर्सला प्रत्येक महिन्याला मोठा पगार देतात. त्यांच्या एका ड्रायव्हरचा एका महिन्यांचा पगार 2 लाखापेक्षा अधिक आहे. सामान्यपणे एका ड्रायव्हरची सॅलरी 20 हजारापर्यंत असते. अंबानी यांचा ड्रायव्हर बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते.

मुकेश अंबानी यांचा ड्राईव्हर निवडण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी त्यांच्या ड्राईव्हरची निवड करते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ड्राईव्हरला मुकेश अंबानी यांची गाडी चालवण्यासाठी पाठवलं जातं.