Saurabh Rajput Murder Case: सौरभ हत्याकांड प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता सौरभची पत्नी आणि मुख्य आरोपी मुस्कानच्या आईने या हत्याकांडाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सौरभच्या एका छोट्याशा चुकीमुळं त्याचा जीव गेला, असा दावा मुस्कानच्या आईने केला आहे.
मुस्कानची आई कविता रस्तोगी यांनी म्हटलं आहे की, आम्ही लग्नाच्या आधी मुस्कानला कधीच फोन वापरू दिला नाही. मात्र लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली. सौरभनेच मुस्कानला साहिलसोबत बोलण्याची परवानगी दिली होती. कारण ते एकाच शाळेत होते. मात्र या त्याच्या छोट्याशा चुकीमुळं सौरभचा जीव गेला.'
मुस्कानची आई म्हणते की, सौरभचा त्याच्या पत्नीवर खूप विश्वास होता. मात्र हाच विश्वास त्याच्यासाठी घातक ठरला. मुस्कान वाईट संगतीत आली. मात्र सौरभला या गोष्टीचा अंदाजच नव्हता की तो कोणत्या मार्गाला जातेय. मुस्कानच्या आईने म्हटलं आहे की, आमच्या मुलीने जे केलं ते माफ करण्याच्या लायक नाहीये. तिला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. साहिल आणि मुस्कानला फाशीची शिक्षा व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सौरभ हत्याकांड प्रकरण हे देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, सौरभची हत्या ही अत्यंत थंड डोक्याने केली आहे. त्यानंतर त्यांनी सौरभचा मृतदेह निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंट टाकलं होतं. पोलिसांनी अटक केल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं आहे.
सौरभ आणि मुस्कानच्या संसारात सुरूवातीपासूनच तणाव होता. मुस्कानचे साहिल नावाच्या मुलापासून आधीपासूनच संबंध होते. तरीदेखील सौरभने तिच्यावर विश्वास ठेवला. सौरभच्या त्यांच्या भेटण्यावर काहीच आक्षेप नव्हता. कारण त्याचा मुस्कानवर विश्वास होता. मात्र त्याचा विश्वासच त्याच्या जीवावर उठला.
सौरभच्या हत्येनंतर मुस्कानच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. मुस्कानने त्यांच्या मुलासारखा जावयाचा विश्वासघात करुन त्याची हत्या केली. ते न्यायाची मागणी करत असून मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.