Bank Job: तुमचा रेझ्युमे करा अपडेट; SBIमध्ये 2600 पदांची भरती, 85 हजारपर्यंत पगार!

SBI CBO Vacancy 2025:  जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Jun 24, 2025, 02:51 PM IST
Bank Job: तुमचा रेझ्युमे करा अपडेट; SBIमध्ये 2600 पदांची भरती, 85 हजारपर्यंत पगार!
एसबीआय नोकरी

SBI CBO Vacancy 2025: बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.   SBI ने यापूर्वी देखील या पदांसाठी अर्ज मागवले होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे अनेक उमेदवार अर्ज करू शकले नाहीत. उमेदवारांची सोय लक्षात घेऊन बँकेने पुन्हा अर्ज करण्याची संधी उघडण्याचा निर्णय घेतलाय.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

पात्रता

एसबीआयच्या रिक्त जागेद्वारे एकूण 2600 पदे भरली जातील. त्याच वेळी 1066 पदे अनारक्षित आहेत. 387 पदे एससी, 190 एसटी, 697 ओबीसी आणि 260 ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.

कुठे मिळेल नोकरी?

भोपाळ सर्कल अंतर्गत मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये 200 पदे, चंदीगड सर्कल अंतर्गत जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये 80 पदे,  लखनऊ सर्कल - उत्तर प्रदेश -280 पदे,  नवी दिल्ली अंतर्गत येणाऱ्या दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये 30 पदे भरली जातील. महाराष्ट्रात 52 रिक्त पदे भरली जातील.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. त्यानंतर त्यांना स्क्रीनिंग टेस्ट, नंतर मुलाखत, स्थानिक भाषा चाचणी उत्तीर्ण व्हावी लागेल. या तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांचा सुरुवातीचा मूळ पगार 48 हजार 480 रुपये असेल. जो स्केलनुसार 84 हजार 920 रुपयांपर्यंत असेल. इच्छुक उमेदवार आता SBI sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

अर्जाची शेवटची तारीख 

30 जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा