अर्रsss! अनेक खातेधारकांना SBI चा दणका; FD खात्यांवरील व्याजदर...

SBI Bank Updates : देशातील महत्त्वाच्या बँकिंग संस्थांपैकी एक असणाऱ्या आणि कोट्यवधी नागरिकांची खाती असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय...

सायली पाटील | Updated: Jun 16, 2025, 02:29 PM IST
अर्रsss! अनेक खातेधारकांना SBI चा दणका; FD खात्यांवरील व्याजदर...
Sbi Savings Bank Account fd fixed deposit interest rates latest update

SBI Bank Updates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अशी ख्याती असणाऱ्या भारतीय स्टेट बँक (SBI) अर्थात एसबीआयनं काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केला असून बँकेच्या सुविधांमध्येही या धर्तीवर बदल करण्यात आले आहेत. 15 जून 2025 पासून बँकेनं हे नियम लागू केले असून त्याचा थेट परिणाम कोट्यवधी खातेधारकांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार एसबीआयनं Savings Account वर 50 टक्के आधार अंकांची कपात केली आहे. विविध कालावधीच्या ठेवींसाठी बँकेनं 3 कोटींहून अधिकच्या फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) वरही 25 आधार अंकांची कपात केली आहे. आरबीआयकडून नुकत्याच झालेल्या पतधोरण बैठकीतील रेपो रेटसंदर्भातील निर्णयानंतर एसबीआयनं हे पाऊल उचललं.

कोणावर होणार सर्वाधिक परिणाम?

एसबीआयकडून सेविंग्स आणि एफडी खात्यांवरील व्याजदरात कपात करण्यासंदर्भातील या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम ज्येष्ठ नागरिक खातेधारकांवर होणार असून बँक डिपॉझिटर्सचाही यात समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

एसबीयकडून सध्याच्या घडीला सर्व अकाऊंट बॅलेन्सवर सेविंग्ज बँक डिपॉझिट रेटमध्ये बदल करत ते 2.5 टक्क्यांवर आणले आहेत. यापूर्वी एसबीआयकडून 10 कोटींहून कमी ठेवी असणाऱ्या खात्यांवर 2.7 आणि 10 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम असणाऱ्या खात्यांवर 3 टक्के व्याज दिलं जात होतं.

Fixed Deposit Interest Rate

राहिला मुद्दा रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉजिट किंवा फिक्स्ड डिपॉझिटचा तर बँकेनं सामान्यांसाठी 211 दिवस ते 1 वर्षाहून कमी कालावधीसाधीच्या रकमेवरील व्याजदर 6.05 टक्के केला आहे. आधी ही आकडेवारी 6.3 टक्के इतकी होती. बँकेनं दोन वर्षांपासू तीन वर्षांहून कमी कालावधीसठीचा व्याजदर 6.7 वरुन 6.45 टक्क्यांवर आणला आहे. या रकमेच्या मॅच्योरिटीवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदर 7.2 टक्क्यांवरून 6.95 टक्क्यांवर आणला आहे.

एसबीआयकडून लागू करण्यात आलेल्या या नव्या दरांसंदर्भातील माहिती नुकतीच जारी करण्यात आली असून त्यासंदर्भातील कोणतेही प्रश्न असल्यास बँक शाखा किंवा ग्राहक मदत केंद्र आणि दूरध्वनी क्रमांकांवरून शंकानिरसन केलं जाईल. त्यामुळं खात्यावरील पैशांच्या या गणिताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.