9 एप्रिलला भारतातील 7 राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर; शाळा कॉलेज बंद राहणार

 9 एप्रिलला भारतातील 7 राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  शाळा कॉलेज बंद राहणार  आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Apr 8, 2026, 04:56 PM IST
 9 एप्रिलला भारतातील 7 राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर; शाळा कॉलेज बंद राहणार

School Holiday  April 9, 2026: भारतातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  केरळ आणि पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. 9 एप्रिलला भारतातील 7 राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर  करण्यात आली आहे. यासह सरकारी कार्यालये, खाजगी आस्थापने आणि व्यावसायिक आस्थापनांनाही सुट्टी देण्यात आली आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं अवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

9 एप्रिल रोजी केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी एकाच टप्प्यात  मतदान होणार आहे,  यामुळे शाळांच्या इमारती आणि सुविधांचा वापर मतदान केंद्र म्हणून केला जाणार आहे. विद्यार्थ्यांची गौरसोय होवू नये यासाठी  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळमध्ये 140 विधानसभा मतदारसंघांमध्ये, तर पुदुचेरीमध्ये 30 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. लाखो मतदार सहभागी होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह हजारो मतदान केंद्रे उभारणार आहे.

9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या  मतदानासाठी प्रभावित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील मतदानाच्या तारखांमुळे शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत.  अधिकृत माहितीच्या आधारे, 9 एप्रिल 2026 रोजीच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. 

केरळ

9 एप्रिल रोजी केरळमध्ये 140 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत. शाळांचा वापर  मतदान केंद्र म्हणूनही केला जाणार आहे. 

पुदुचेरी (केंद्रशासित प्रदेश)

पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.  शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिस बूथ उभारले जाणार आहेत. यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. 

आसाम

आसाम विधानसभेच्या 126  जागांसाठी मतदान ९ एप्रिल रोजी होणार आहे. शाळांसाठीच्या अधिकृत सुट्ट्यांची सूचना जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे. स्थानिक प्रशासने मतदान क्षेत्रांमधील शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

गोवा 

गोव्यामध्ये 21 पोंडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे.  ९ एप्रिल रोजी भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी मतदार आणि कार्यकर्त्यांना लागू असली तरी, मतदानाच्या व्यवस्थेमुळे प्रभावित मतदारसंघांमधील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद राहण्याची शक्यता आहे.  

कर्नाटक

कर्नाटकातील काही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.  कायद्यानुसार मतदारांना भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

नागालँड आणि त्रिपुरा

विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नागालँड आणि त्रिपुरा दोन्ही राज्यांमध्ये 9 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More