मुंबई : शेअर बाजारात गेले 4 दिवस गदारोळ सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंसेक्स 1000 अंकाहून अधिक तुटलं आहे. निफ्टी अगदी 10 हजाराच्या जवळपास आली आहे. गेल्या 4 कामाच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर सेंसेक्समध्ये 2500 अंकानी खाली उतरलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की, हे बाजार खाली पडण्याचे कारण काय असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. 


शेअर मार्केट कोसळण्याचं कारण?


केजरीवाल रिसर्च अॅण्ड इन्वेस्टमेंट सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेड फाऊंडर आणि अॅनालिस्ट अरूण केजरीवाल यांनी सांगितले की, मार्केट कोसळण्याचं कारण स्पष्ट आहे. ग्लोबल मार्केट एक्सपेंसिव वॅल्यूएशनवर आधारित आहे. याचाच परिणाम आपल्याला शेअर बाजारात दिसत आहे. ग्लोबल बाजारांतील फरक आपल्याला भारतीय बाजारात दिसत आहे. 


केव्हापर्यंत असणार मार्केटची अशी अवस्था 


अरूण केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार भारतीय शेअर बाजारात आता कंसोलिडेशनचा स्कोप आहे. सेंसेक्स 31000 पर्यंत येऊ शकतं. निफ्टीदेखील 10 हजारापर्यंत राहिल. 


गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे?


सध्या बाजारात करेक्शन होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यापासून थोडं सावध रहावं.. काही दिवस खऱ्या अर्थाने सुट्टीवर जावे. कारण आताच्या काळात खरेदी करणं नुकसानीचं ठरू शकतं. आणि लाँग टर्मच्या विचाराने गुंतवणूक करत असाल तर चांगल्या कंपनीत गुंतवण कायम फायदेशीर आहे. 


कुठे आहे खरेदी करण्याची संधी 


बाजार कोसळल्यावर खरेदी करायची असल्यास ज्या कंपन्यांचे फंडामेंटल मंजबूत आहेत. त्या कंपनीत गुंतवणूक करणं फायद्याचं असू शकेल. 


सर्वाधिक नुकसान कुणाचं होणार 


मिडकॅप आणि स्मॉलकॅप केल्या कित्येक दिवसांपासून खाली आहे. गुंतवणूकदार छोट्या कंपन्यांमधून पैसे बाहेर काढत आहेत. सगळ्यात जास्त नुकसान बँकिंग सेक्टरला होत आहे. आयटी आणि ऑटो सेक्टर देखील दबावात आहेत.