मुंबई : शुक्रवारी मध्यरात्री GST लागू झाल्यानंतर आज प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारांमध्ये नव्या कररचनेचं भव्य स्वागत झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून बाजाराला अशा प्रकारच्या सुधारणांची प्रतीक्षा होती. 30 जूनच्या मध्यरात्री ही प्रतीक्षा संपल्यानंतर आज सेन्सेक्समध्ये तब्बल 300 अंशांची वाढ झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्याभरातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 94 अंशांची चांगली वाढ बघायला मिळाली. FMCG, टेलिकॉम, धातू, बांधकाम आणि वाहन क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली.