Accident News : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुवन्नामलाईमध्ये एक भीषण अपघात झालाय. तिरुवन्नमलाई (Tiruvannamalai) जिल्ह्यातील चेंगमजवळ रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कार आणि लॉरीची समोरासमोर धडक झाल्याने ही भीषण घटना घडली. या अपघातात एकजण गंभीर जखमी देखील झाले आहे. चेंगम पोलिसांनी (Tamil Nadu Police) स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतांची ओळख पटवल्यानेचे काम सुरु आहे. चेंगम पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिरुवन्नमलाई जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एक महिला आणि दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तिरुवन्नमलाई येथील मंदिराच्या दर्शनानंतर बंगळुरूला परतणाऱ्या कर्नाटकातून घरी परतणाऱ्या भाविकांसोबत हा भीषण अपघात घडलाय. त्यांची कार एका ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


या अपघामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना कार कापून मृतदेह बाहेर काढावे लागले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून चालकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने लुकआउट नोटीस जारी केली आहे. चेंगम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या तपास सुरू आहे.



दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुसाट वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला. मात्र या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा वर्षांच्या एका चिमुकल्यासह 12 जण जागीच ठार झाले आहेत. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण 35 प्रवासी होते.