सर्वात धक्कादायक, होस्टेलच्या मुलींसोबत अतिशय घृणास्पद प्रकार

सहजानंद गर्ल्स इन्सिट्युटमधील घृणास्पद प्रकार समोर आला आहे. स्वामीनारायण मंदिरद्वारा चालवण्यात

Updated: Feb 14, 2020, 07:23 PM IST
सर्वात धक्कादायक, होस्टेलच्या मुलींसोबत अतिशय घृणास्पद प्रकार

भुज : गुजरातमधल्या भुजच्या सहजानंद गर्ल्स इन्सिट्युटमधील घृणास्पद प्रकार समोर आला आहे. स्वामीनारायण मंदिरद्वारा चालवण्यात येणाऱ्या या संस्थेत मुलींच्या मासिक पाळीची चौकशी करण्यात आली. त्यांना केवळ याबाबत विचारणाच करण्यात आली नाही, तर त्यांचे कपडे उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि प्राध्यपकांच्या उपस्थिती हा सारा संतापजनक प्रकार सुरू होता. 

तब्बल ६० विद्यार्थिनींची याबाबत तपासणी करण्यात आली. स्वामी नारायण पंथाच्या नियमानुसार मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींना वेगळं ठेवण्यात येतं आणि त्यांच्या खाण्यापीण्याची सोयदेखील वेगळी करण्यात येते. त्यामुळे काही मुली मासिक पाळी लपवत तर नाहीत ना या शंकेपोटी त्यांची कपडे उतरवून तापसणी करण्यात आली. 

विद्यार्थिनींनी या प्रकाराला विरोध केल्यानंतर त्यांना होस्टेलमधून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली. मात्र काही विद्यार्थींनींनी याबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिल आहेत.